शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

अभ्यासक्रमांचे धडे आता ‘चित्रपटा’तून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:02 IST

दृक्-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांचा अध्ययनातील रस वाढतो , हीच गोष्ट लक्षात घेऊन सदर बाजार येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या वतीने महाविद्यालयात ‘मूव्ही क्लब’ची स्थापना केली आहे. क्लबच्या माध्यमातून चित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार आहेत.

ठळक मुद्देअभ्यासक्रमांचे धडे आता ‘चित्रपटा’तूनशाहू कॉलेजचा अभिनव उपक्रम : ‘मूव्ही क्लब’ची स्थापना

प्रदीप शिंदेकोल्हापूर : दृक्-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांचा अध्ययनातील रस वाढतो , हीच गोष्ट लक्षात घेऊन सदर बाजार येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या वतीने महाविद्यालयात ‘मूव्ही क्लब’ची स्थापना केली आहे. क्लबच्या माध्यमातून चित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार आहेत.पारंपरिक शिक्षणव्यवस्थेत, शिक्षक शिकवीत असलेल्या स्थळी आणि वेळीच, विद्यार्थ्यांनी उपस्थित असणे आवश्यक असते. कुठल्याही कारणामुळे, जर विद्यार्थी त्याच स्थळी आणि वेळी उपस्थित राहू शकत नसेल, तर तो त्या अभ्यासक्रमापासून वंचित राहू शकतो किंवा काही वेळा शिक्षण घेण्यास पोषक मानसिकता नसते. यामुळे खऱ्या अर्थाने क्लास रूमचा मूळ उद्देश संपतोच. या सर्व गोष्टींचा विचार करीत नावीन्याकडे एक पाऊल टाकत राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमधील इंग्रजी विभागाच्या वतीने ‘मूव्ही क्लब’ची स्थापना केली आहे.विद्यार्थ्यांना साहित्य आणि चित्रपटातील सौंदर्य समजावून सांगणे या उद्देशाने या क्लबची स्थापन झाली. इंग्रजी विषयाच्या ऐच्छिक आणि स्पेशल स्तरावर अभ्यासक्रमात सिनेमा आणि वाङ्मय व हिंदुस्थानची फाळणी आणि वाङ्मय असे दोन विषय बी. ए. भाग २ या स्तरावर या वर्षापासून सुरू करण्यात आले आहेत.

त्यानुसार बी. ए. भाग १, २ व ३ वर्गांतील इंग्रजी स्पेशल व ऐच्छिक विषयाच्या विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून विविध साहित्यकृतींचा परिचय करून देण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे.गुणवत्ता वाढणारक्लबचा माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता तर वाढणार आहे. यासह शिक्षण आनंददायी आणि सहजदेखील होईल. साहजिकच सर्व विद्यार्र्थ्यांना आकलन होणारे हे माध्यम खूप सोयीस्कर आहे. वेगवेगळ्या वर्गांत, एकच विषय, एकच शिक्षक जरी शिकवीत असला तरी प्रत्येक वर्गातील प्रत्येक तासाची गुणवत्ता निश्चितपणे वेगवेगळी असते.

ही गुणवत्ता प्रत्यक्ष तासाच्या वेळी असलेल्या शिक्षकाच्या आसपासच्या वेगवेगळ्या भौगोलिक व मानवी परिस्थितीवर अवलंबून असते. याच सर्व गोष्टींचा विचार करून या क्लबची स्थापना केली आहे.

हे चित्रपट, नाटक दाखविणारअंगूर (कॉमेडी आॅफ एरर्स शेक्सपीअर), ट्रेन टू पाकिस्तान (खुशवंतसिंग), महानिर्वाण (सतीश साळेकर), डिसग्रेस (जे. एम. कोडजी), बारोमस ( सदानंद देशमुख), इव्होल्युशन आॅफ सिनेमा ( माहितीपट), पार्टिशन आॅफ इंडिया (माहितीपट) दाखविले जाणार आहे.

 

पंधरा दिवसांतून एकदा हा उपक्रम राबविला जाणार आहे. अभ्यासक्रमांच्या संबंधित आम्ही चित्रपट दाखविणार आहे. यासह माहितीपट, मुलाखत, नाटक दाखविले जाणार आहे. ती इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये असतील.- प्रा. डॉ. एस. एम. साठेइंग्रजी विभागप्रमुख

 

 

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर