शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पस्तीस वर्षांनंतर बदलला अभ्यासक्रम

By admin | Updated: August 31, 2015 00:09 IST

कला संचालनालयाची मान्यता : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

संदीप आडनाईक- कोल्हापूर  -पस्तीस वर्षांपूर्वीचा चित्रकलेचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, जुलै २0१५ पासून नवा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. राज्यात कला संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट शासकीय ग्रेड परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, या उद्देशाने त्यात बदल करण्यात आला आहे.चित्रकलेची नवीन पुस्तकेही केंद्र प्रमुखांमार्फत सर्व शाळांमध्ये वितरित करण्यात आली आहेत, अशी माहिती अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य शिवाजी म्हस्के यांनी दिली. १८८0 मध्ये जुन्या मुंबई राज्यात सर्वप्रथम ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षा सुरू केल्या होत्या. १९६५ पासून राज्याच्या कला संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षा महाराष्ट्रासोबतच गोवा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आदी राज्यांतही घेतल्या जातात. विशेष म्हणजे चित्रकलेचे शिक्षण देणाऱ्या देशभरात ३८ अनुदानित संस्था असून, २५0 हून अधिक संस्था विनाअनुदानित आहेत. २00९ मध्ये अभ्यासक्रम बदलण्याची मागणी कला शिक्षकांनी केली होती. २0१४ मध्ये अभ्यासक्रम बदलण्यास राज्य कला संचालनालयाची मान्यता मिळाली. २0१५ च्या शैक्षणिक वर्षापासून बदललेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. वर्तमानकालीन शैक्षणिक दृष्टिकोन व त्यातील कला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित व्हावे. प्रस्तुत परीक्षांमुळे कलेची आवड निर्माण व्हावी, हा उद्देश आहे. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. - शिवाजी म्हस्के,सदस्य, अभ्यासक्रम पुनर्रचनासमिती, कोल्हापूरज्येष्ठ, अनुभवी व कलाध्यापनाचा अनुभव असलेले संपन्न कलाशिक्षक तसेच प्रशासकीय प्रतिनिधींच्या समितीने अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली. त्यावर अभिप्राय मागविण्यात आले. त्यानंतर सुधारित अभ्यासक्रमाच्या रचनेस अंतिम स्वरूप देण्यात आले. - प्रा. गो. गो. वाघमारे,प्रभारी कला संचालक,कला संचालनालय, मुंबई