शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भ्रष्टाचार खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:05 AM

कोल्हापूर : तलाठ्यांनी अंतर्मुख होऊन जनतेची कामे करताना आपले स्वत:चेच काम आहे, असे समजून करावे. वर्षभरात राज्यात तीनशेहून अधिक तलाठी लाचखोरीमुळे निलंबित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेबाबत आग्रही आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिला. तसेच सातबारा आॅनलाईनचे ...

कोल्हापूर : तलाठ्यांनी अंतर्मुख होऊन जनतेची कामे करताना आपले स्वत:चेच काम आहे, असे समजून करावे. वर्षभरात राज्यात तीनशेहून अधिक तलाठी लाचखोरीमुळे निलंबित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेबाबत आग्रही आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिला. तसेच सातबारा आॅनलाईनचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून महाराष्टÑ देशात पहिल्या क्रमांकावर नेऊया, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.लोणार वसाहत येथील गणेश हॉल येथे महाराष्टÑ राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा व आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती पुणे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे, विभागीय अध्यक्ष बी. बी. काळे, जिल्हाध्यक्ष धनाजी कलिकते, महाराष्टÑ तलाठी, पटवारी, मंडलाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष शाम जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार उत्तम दिघे, तहसीलदार चंद्रशेखर सानप आदींची होती.मेळावा व आमसभेचे उद्घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने झाले.महसूलमंत्री पाटील म्हणाले, आॅनलाईन सात-बाºयाचे काम ६० टक्क्यांपर्यंत झाले असून हे काम फेबु्रवारीपर्यंत पूर्ण करून विजयाची गुढी उभा करूया. भ्रष्टाचार करू नका कारण इथून पुढचा काळ हा प्रामाणिकपणाचा असून सर्वसामान्य माणूस हा प्रामाणिकपणालाच संधी देणार आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २० तर राज्यात ३०० हून अधिक तलाठी लाचखोरीत निलंबित झाले. त्यासाठी अंतर्मुख होण्याची गरज आहे. त्यामुळे भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. सरकार तलाठ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व मागण्या मान्य करण्यास बांधील आहे. पुढील महिन्यात महसूलसंदर्भात मुंबईत बैठक घेऊन तलाठी संघाच्या पदाधिकाºयांशी चर्चा करू.एस. चोक्कलिंगम म्हणाले, राज्यातील ७५ तालुक्यांचे व पुणे विभागातील ३०० गावांचे संगणकीकरणाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील कामासाठी संगणकाची गती वाढविण्यासाठी भारत संचार निगमकडून प्रयत्न होत आहेत. उर्वरित काम फेब्रुवारी-मार्चपर्यंत पूर्ण होईल.ज्ञानदेव डुबल म्हणाले, सातबारा संगणकीकरणाचा प्रकल्प हा शासनासह तलाठ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने पुरेशा सुविधा नसतानाही तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी सर्व्हरच्या स्पीडसह इतर मागण्या सोडवाव्यात.म्हातारदेव सावंत यांनी स्वागत केले. लक्ष्मीकांत काजे यांनी प्रास्ताविक केले.तलाठी सरकारचे कान अन् डोळेतलाठी हे सरकार व गावचे कान आणि डोळे आहेत. त्यांच्याकडून सरकारला योग्य ती माहिती मिळते. त्यामुळे सरकार नेहमीच त्यांच्याकडे आदराने पाहत आला आहे. संपूर्ण गावाचे माहिती केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार बांधील आहे, असे महसूलमंत्री पाटील यांनी सांगितले.