शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

Coronavirus Unlock : चायनीज पदार्थांकडेही खवय्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:34 AM

कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे चायनीज पदार्थांकडेही खवय्यांचा ओढा कमी झाला होता, त्यात आता सीमेवर चीननेही भारताबरोबर पंगा घेतल्यावर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आल्याने चायनीज पदार्थ बनवून विक्री करणाऱ्या दीड हजार जणांचा रोजगार बुडाला आहे. या व्यवसायातील गेल्या तीन महिन्यांत सुमारे पाच कोटींपेक्षा अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देपाच कोटींची उलाढाल ठप्प दीड हजार जणांचा रोजगार बुडाला

सचिन भोसलेकोल्हापूर : कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे चायनीज पदार्थांकडेही खवय्यांचा ओढा कमी झाला होता, त्यात आता सीमेवर चीननेही भारताबरोबर पंगा घेतल्यावर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आल्याने चायनीज पदार्थ बनवून विक्री करणाऱ्या दीड हजार जणांचा रोजगार बुडाला आहे. या व्यवसायातील गेल्या तीन महिन्यांत सुमारे पाच कोटींपेक्षा अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे.अलीकडील काही वर्षांत चायनीज पदार्थांना मोठी मागणी आहे. कोंबड्यांपासून कोरोना होतो अशी अफवा पसरल्यानंतर चायनीज पदार्थांकडे खवय्यांनी पाठ फिरवली. त्यानंतर लॉकडाऊन आणि चीनने सीमेवर भारताबरोबर पुकारलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यात भर पडली. त्याचा फटका कोल्हापुरातील चायनीज सेंटर चालविणाऱ्यांना बसला.

अनेकांनी व्यवसाय अक्षरश: गुंडाळले आहेत. काही मोजक्याच सेंटरमधून गोबी मंच्युरियन, सिक्स्टी फाईव्ह, शेजवान राईस, अख्खा नूडल्स, विविध सुप, फ्राईड राईस अशा पदार्थांची मागणी अल्प प्रमाणात आहे. त्यातून हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच लोकांची कुटुंबे या सेंटरवर चालत आहेत. या व्यवसायाला लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्या व्यावसायिकांचा व्यवसायही ठप्प झाला आहे.या पदार्थांना सर्वाधिक मागणी होतीशेजवान राईस, नूडल्स वुईथ राईस, सिंगापुरी राईस, जिंजर राईस, हॉगकाँग राईस, यंग चाऊ राईस, मलेशियन राईस, ट्रिपल शेजवान राईस, मांसाहारी फ्राईड राईस, हक्का नूडल्स, शेजवान नूडल्स, चाऊ मेन, चायनीज भेळ, व्हेज सुप, नूडल्स सुप, स्वीटकार्न सुप, हॉट अ‍ॅन्ड सोर सुप, व्हेज मंच्युरी, व्हेज चिली, स्विट गार्लिक सुप, फ्राईड क्रीस्पी अशा पदार्थांना मागणी अधिक होती. मात्र, आता केवळ मंच्युरियन , सिक्स्टी फाईव्हलाच तेही अत्यल्प मागणी आहे.सेला राईसची मागणी घटलीचायनीज पदार्थांमध्ये विविध प्रकारचे शेजवान राईस, फ्राईड राईस बनविण्याकरीता सेला या जातीचा तांदूळ लागतो. तो दिल्ली येथून देशभरात जातो. कोल्हापुरातही या तांदळाला महिन्याकाठी ६० टनांची मागणी होती. लॉकडाऊननंतर ती अत्यल्प झाली आहे.शहरात ३५० हून अधिक चायनीज सेंटरशहरात ३५० हून अधिक चायनीज खाद्यपदार्थ सेंटर आहेत. त्यांपैकी केवळ ५० जणांची महापालिका इस्टेट विभागात नोंदणी आहे. चालकांसह १५०० हून अधिक जणांची कुटुंबे या व्यवसायावर निर्भर आहेत.चिली बेन पेस्टचीनमधून काही मसाल्याच्या पदार्थांबरोबर चिली बेन पेस्ट येतात. या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळण्यासाठी लागणारे मोनोसोडियम ग्लुटामेंट (अ‍ॅजिनोमोटो), शेजवान राईस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न, सोया, चिली, मंच्युरियन, ड्रॅगन फ्रुट‌्स असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सॉस महत्त्वाचा घटक आहे. हे स्थानिक पातळीवर तयार होतात आणि मिळतातही. मात्र, या पदार्थांकडेही संशयाने पाहिले जात आहे

भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊननंतर चायनीज पदार्थांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.- अरविंद काळुगडे, चायनीज सेंटर चालक

टॅग्स :chinese dragonचिनी ड्रॅगनkolhapurकोल्हापूरfoodअन्न