CoronaVirus :जिल्हाअंतर्गत एस.टी.चे प्रवासी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:02 IST2020-05-26T18:01:22+5:302020-05-26T18:02:32+5:30
कोल्हापूर जिल्हाअंतर्गत सुरू असलेल्या एस.टी.चे प्रवासी चौथ्या दिवशी वाढले. १४ बसेसमधून २२६ जणांनी प्रवास केला. तर कामगारांना रेल्वेस्थानकांवर सोडण्यासाठी १२ गाड्या रवाना झाल्या. जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारपासून जिल्हाअंतर्गत एस. टी. सेवा पुन्हा सुरू झाली आहे.

CoronaVirus :जिल्हाअंतर्गत एस.टी.चे प्रवासी वाढले
कोल्हापूर : जिल्हाअंतर्गत सुरू असलेल्या एस.टी.चे प्रवासी चौथ्या दिवशी वाढले. १४ बसेसमधून २२६ जणांनी प्रवास केला. तर कामगारांना रेल्वेस्थानकांवर सोडण्यासाठी १२ गाड्या रवाना झाल्या. जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारपासून जिल्हाअंतर्गत एस. टी. सेवा पुन्हा सुरू झाली आहे.
आज कोल्हापूर-इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कुरुंदवाड-इचलकरंजी गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला. गारगोटी, मलकापूर, चंदगड, कागल, राधानगरी, गगनबावडा, आजरा या ठिकाणाहून एकही गाडी बाहेर पडली नाही.
रेल्वेस्थानकांवर कामगारांना सोडण्यासाठी चंदगड, कागल, कुरुंदवाड, गडहिंग्लज, पोर्ले येथून एकूण १२ गाड्यांमधून १८० कामगारांना रेल्वेस्थानकांवर सोडण्यात आले.