CoronaVirus : मीनाक्षी गजभिये पुन्हा सीपीआरमध्ये कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 15:40 IST2020-05-27T15:36:51+5:302020-05-27T15:40:47+5:30

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाबाबत मंगळवारी उशिरापर्यंत कोणतेही सुधारित आदेश निघालेले नव्हते. डॉ. मीनाक्षी गजभिये यांना जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जात असताना तिकडे जाऊ नका, असा निरोप आल्याने त्या पुन्हा सीपीआरमध्ये कार्यरत झाल्या.

CoronaVirus: Meenakshi Gajbhiye working in CPR again | CoronaVirus : मीनाक्षी गजभिये पुन्हा सीपीआरमध्ये कार्यरत

CoronaVirus : मीनाक्षी गजभिये पुन्हा सीपीआरमध्ये कार्यरत

ठळक मुद्देमीनाक्षी गजभिये पुन्हा सीपीआरमध्ये कार्यरत सुधारित आदेशाची प्रतीक्षा

कोल्हापूर  : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाबाबत मंगळवारी उशिरापर्यंत कोणतेही सुधारित आदेश निघालेले नव्हते. डॉ. मीनाक्षी गजभिये यांना जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जात असताना तिकडे जाऊ नका, असा निरोप आल्याने त्या पुन्हा सीपीआरमध्ये कार्यरत झाल्या.

डॉ. गजभिये यांनी मंगळवारी सीपीआरमध्ये येऊन आपल्या दैनंदिन कामकाजास सुरुवात केली आहे. दरम्यान, रामानंद यांना विरोध करण्यावरून माजी आमदार राजेश क्षीरसागर संतापले आहेत, पण दुसरीकडे अन्य मंत्र्यांनी याबाबत काहीही जाहीर भूमिका घेतलेली नाही. सीपीआरला पुन्हा प्रभारी अधिष्ठाता न देता पूर्णवेळ अधिष्ठाता द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील काही आमदारांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता नेमकी कुणाची वर्णी लागणार हे सुधारित आदेशानंतर स्पष्ट होणार आहे.



शासन आदेशानुसार जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी गेले होते. मात्र, तो स्वीकारू नये, अशा सूचना मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तातडीने कोल्हापूरला परत आले असून पुन्हा काम सुरू केले आहे.
- डॉ. मीनाक्षी गजभिये
अधिष्ठाता, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.
 

Web Title: CoronaVirus: Meenakshi Gajbhiye working in CPR again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.