Coronavirus in Maharashtra कोल्हापूरात चिंतेत भर -- कोरोनाग्रस्तांची संख्या ३१३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 18:52 IST2020-05-24T18:22:15+5:302020-05-24T18:52:37+5:30
दिवसभरात आलेल्या पॉझीटव्ह अहवालापैकी शाहूवाडी तालुक्यातील ६ तर गगणबावडा व भुदरगडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Coronavirus in Maharashtra कोल्हापूरात चिंतेत भर -- कोरोनाग्रस्तांची संख्या ३१३ वर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसे- दिवस भर पडत आहे, दिवसभरात सायंकाळपर्यत सुमारे २७ नव्या बाधीत रुग्णांची भर पडल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधीत कोरोनाग्रस्तांची संख्या ३१३ वर पोहचली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पर जिल्ह्यातून आलेल्यां नागरीकांच्या मुळे कोरोनाबाधिताच्या संख्येत दिवसे-दिवस भर पडत आहे. शनिवारपर्यत ही संख्या २८६ पर्यत पोहचली होती. रविवारी दुपारी ६५१ चाचणी अहवालापैकी ६४३ अहवाल निगेटिव्ह आले, त्यामध्ये ८ चाचणी पॉझीटिव्ह आले आहे. तर दुपारनंतर आणखी १९ अहवाल पॉझीटिव्ह आले, त्यामुळे दिवसभरात सायंकाळपर्यत एकूण २७ चाचण्या पॉझीटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३१३ वर पोहचली आहे. दिवसभरात आलेल्या पॉझीटव्ह अहवालापैकी शाहूवाडी तालुक्यातील ६ तर गगणबावडा व भुदरगडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.