CoronaVirus Lockdown : दोन महिन्यानंतर कोल्हापुरातून विमानाचे उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:59 IST2020-05-25T17:56:59+5:302020-05-25T17:59:27+5:30
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून स्थगित असणारी कोल्हापूरची विमानसेवा सोमवारपासून पूर्ववत सुरू झाली. अलायंस एअरकडून हैदराबाद-कोल्हापूर- हैदराबाद मार्गावरील सेवेचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एकूण ३३ जणांनी प्रवास केला. हैदराबादहून आलेल्या ११ प्रवाशांना जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

CoronaVirus Lockdown : दोन महिन्यानंतर कोल्हापुरातून विमानाचे उड्डाण
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून स्थगित असणारी कोल्हापूरचीविमानसेवा सोमवारपासून पूर्ववत सुरू झाली. अलायंस एअरकडून हैदराबाद-कोल्हापूर- हैदराबाद मार्गावरील सेवेचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एकूण ३३ जणांनी प्रवास केला. हैदराबादहून आलेल्या ११ प्रवाशांना जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीनुसार देशाअंतर्गत विमानसेवा सोमवारपासून सुरू झाली. अलायंस एअरचे विमान १५ प्रवाशांसह दुपारी पावणेतीन वाजता कोल्हापूर विमानतळावर उतरले.
या सर्वांची प्राथमिक स्वरूपातील आरोग्य तपासणी येथील जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय पथकाकडून करण्यात आली. त्यातील ११ जणांना जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय तपासणी, क्वॉरंटाईन करण्यासाठी विमानतळावरून नेले. एक महिला प्रवासी आणि तिच्यासमवेत असलेल्या दोन लहान मुलांना रत्नागिरीच्या हद्दीपर्यंत सोडण्यात आले.