CoronaVirus Lockdown :वाढदिवसादिवशीच श्रद्धांजली..! उद्योजक राहूल पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:17 IST2020-05-15T17:15:56+5:302020-05-15T17:17:30+5:30
येथील हॉटेल साई प्लाझाचे मालक, राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व तरूण उद्योजक राहूल विश्वनाथ पाटील (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने (गुरूवारी) पहाटे निधन झाले. आज त्यांचा वाढदिवस होता. परंतु, काळाने त्यांच्यावर अकाली घाला घातल्यामुळे वाढदिनीच त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ त्यांच्या परिवारांसह गडहिंग्लजकरांवर आली.

CoronaVirus Lockdown :वाढदिवसादिवशीच श्रद्धांजली..! उद्योजक राहूल पाटील यांचे निधन
गडहिंग्लज : येथील हॉटेल साई प्लाझाचे मालक, राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व तरूण उद्योजक राहूल विश्वनाथ पाटील (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने (गुरूवारी) पहाटे निधन झाले. आज त्यांचा वाढदिवस होता. परंतु, काळाने त्यांच्यावर अकाली घाला घातल्यामुळे वाढदिनीच त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ त्यांच्या परिवारांसह गडहिंग्लजकरांवर आली.
काँगे्रसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व गडहिंग्लज अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. व्ही. एस. पाटील यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव तर नगरसेविका शुभदा पाटील यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी मुलगी, मुलगा, विवाहित बहिण, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते. सध्या ते प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि गडहिंग्लज शहर हॉटेल व परमीट रूम असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. येथील लिंगायत दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.