शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

CoronaVirus Lockdown : माणुसकीचे दर्शन, शिप्पुरकर धावले मुंबईकरांच्या मदतीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:22 PM

गड्या आपुला गाव बरा, अशीच ठायी ठायी आठवण मुंबईत राहणाऱ्या गावाकडच्या लोकांना येईल, अशीच कामगिरी गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर तर्फ नेसरी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देगावाकडच्या लोकांनी घडविले माणुसकीचे दर्शन ! शिप्पुरकर धावले मुंबईकरांच्या मदतीला

रवींद्र हिडदूगीनेसरी : गड्या आपुला गाव बरा, अशीच ठायी ठायी आठवण मुंबईत राहणाऱ्या गावाकडच्या लोकांना येईल, अशीच कामगिरी गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर तर्फ नेसरी येथील ग्रामस्थांनी केली आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झाल्यामुळे सर्वत्र विशेषत: मुंबईतील रहिवाशांवर मोठे संकट ओढवल्यामुळे नेहमी मुंबईहून मदत मागविण्याची पायंडा असताना गावाकडच्या मंडळींनी प्रथमच मुंबईकरांनाच मदत पाठविली आहे. या मदतीचे मुंबईकरांसह इतरांनी कौतुक केले आहे.कोरोना विषाणूचा विळखा मुंबईभोवती असल्याने सध्या मुंबईकडे सारेजणच संशयाने पहात आहेत. आजाऱ्यांशी नव्हे, आजाराशी लढायचे आहे, अशा जाहिरातीमुळे गावोगावच्या लोकांचेही मनोधैर्य वाढत आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर येथील ग्रामस्थांनी मुंबईत अडकलेल्या आपल्या परिचयाच्या सुमारे पन्नास कुटुंबीयांसाठी साहित्य जमा करुन आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले.मुंबईहून गावी परतलेल्या लोकांसाठीही गावच्या बाहेर ग्रामस्थांनी उत्तम व्यवस्था करून त्यांचीही मने जिंकली आहेत. तांदूळ, गहूपीठ, डाळी, चटणी आदी साहित्यासह प्रत्येकाच्या नावाची यादी तयार करून ते मुंबई पाठविले आहे.

यासाठी माजी सरपंच बाबुराव शिखरे, पोलीस पाटील भरमा गुरव, सचिन भालेकर, पांडुरंग गाडे, नामदेव माटले आदींनी पुढाकार घेऊन हे काम तडीस नेले. भैरवनाथ ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी दोन्ही वेळा मुंबईहून माल वाहतूकीच्या गाड्या पाठवून मदत केली.मुंबईकरांसाठी गावाकडून आलेली ही मदत माणुसकीचे उत्तम दर्शन देत तर आहेच, परंतु तिरस्काराच्या वातावरणात चांगले उदाहरणही घालून देत आहे. याबद्दल मुंबईकरांनीही ग्रामस्थांचे आभार मानले असून केलेल्या धडपडीबद्दल कौतुक केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई