CoronaVirus Lockdown : जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा घेण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:48 IST2020-05-27T14:47:37+5:302020-05-27T14:48:38+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असूऩ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा १० जूनपर्यंत ही ...

CoronaVirus Lockdown : जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा घेण्याच्या हालचाली
कोल्हापूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असूऩ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा १० जूनपर्यंत ही सभा होण्याची शक्यता आहे. दर तीन महिन्यांमध्ये जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. ही मुदत १६ जूनपर्यंत आहे.
यातील अडीच महिने आता कोरोनाच्या वातावरणामध्येच गेले आहेत. या दरम्यान शासनाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे याबाबतची चर्चा या सभेत होईल.
ही सभा कधी घ्यायची याबाबत अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांशी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल चर्चा करत असून लवकरच तारीख निश्चित होईल, असे सांगण्यात आले.
१ जूनपासून लॉकडाऊनचे नियम कसे राहतात याचा विचार करून ही सभा ऑनलाईन पद्धतीने घ्यायची की सर्वच सदस्यांना सभेसाठी निमंत्रित करावयाचे यावरही निर्णय होणार आहे.