शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

CoronaVirus Lockdown : आतापर्यंत सर्वाधिक १२२८ नागरिकांचे घेतले स्राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 4:33 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या घसा आणि नाकातील स्राव घेण्यासाठीची केंद्रे वाढविल्यामुळे आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे १२२८ नागरिकांचे स्राव एका दिवसात घेण्यात आले. दिवसभरामध्ये १५९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर ११६१ अहवाल प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत सर्वाधिक १२२८ नागरिकांचे घेतले स्रावजिल्ह्यात १५९२ नागरिकांची झाली तपासणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या घसा आणि नाकातील स्राव घेण्यासाठीची केंद्रे वाढविल्यामुळे आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे १२२८ नागरिकांचे स्राव एका दिवसात घेण्यात आले. दिवसभरामध्ये १५९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर ११६१ अहवाल प्रलंबित आहेत.दिवसभरामध्ये येथील सीपीआर रुग्णालयात ३७६ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर २५९ जणांचे स्राव घेण्यात आले. आयजीएम, इचलकरंजी येथे दिवसभरामध्ये १२१ जणांची तपासणी आणि २८ जणांचे स्राव घेण्यात आले. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात ३३६ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर या सर्वांचे स्राव घेण्यात आले. परराज्यांतून आणि परजिल्ह्यांतून नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे बाराही तालुक्यांत नागरिकांचे स्राव घेण्याची सोय करण्यात आली आहे.जिल्हाभर स्राव घेण्याची सोय झाल्यामुळे आता येथील शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेवरही मोठा ताण आला आहे. एक हजाराहून अधिक अहवाल प्रलंबित असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना आता या अहवालांची प्रतीक्षा आहे.आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ५२२१ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांपैकी ३८२४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अजूनही १३२५ अहवाल आलेले नसून ११ नमुने पुन्हा तपासण्यात आले आहेत, तर ४० नमुने नाकारण्यात आले आहेत.तीन पॉझिटिव्ह युवकांच्या संपर्कात ७८ जणशाहूवाडी तालुक्यातील केरले येथील पॉझिटिव्ह युवकाच्या प्रथम संपर्कामध्ये १२, तर द्वितीय संपर्कामध्ये पाचजण आले आहेत. याच तालुक्यातील माणगाव येथील पॉझिटिव्ह युवकाच्या प्रथम संपर्कात सहाजण आले असून, सातवे (ता. पन्हाळा) येथील पॉझिटिव्ह युवकाच्या प्रथम संपर्कात २५, तर द्वितीय संपर्कात ३० जण आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर