CoronaVirus Lockdown : खोतवाडी ग्रामपंचायतीवर परप्रांतीय कामगारांनी केली दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 13:14 IST2020-05-18T13:13:30+5:302020-05-18T13:14:16+5:30
खोतवाडी ग्रामपंचायत येथे जमलेल्या बिहारच्या परप्रांतीय मजुरांनी ग्रामपंचायत व पोलीसांवर दगडफेक केली. त्यामध्ये एक महिला कॉन्स्टेबल जखमी झाली आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे.

CoronaVirus Lockdown : खोतवाडी ग्रामपंचायतीवर परप्रांतीय कामगारांनी केली दगडफेक
तारदाळ : खोतवाडी ग्रामपंचायत येथे जमलेल्या बिहारच्या परप्रांतीय मजुरांनी ग्रामपंचायत व पोलीसांवर दगडफेक केली. त्यामध्ये एक महिला कॉन्स्टेबल जखमी झाली आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले आहे.
हमे गाव जाना है असे म्हणत सुमारे ३५० बिहारी कामगार सोमवारी सकाळी खोतवाडी ग्राम पंचायत समोर जमले. त्यांना आज कोणतीही रेल्वे नाही असे सांगून नियोजन झाल्यावर निरोप देतो असे त्यांना ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व पोलीस सांगत होते.
परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या कामगारांनी अचानक हल्ला करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.