CoronaVirus Lockdown : पहिल्याच दिवशी ४० लाखांचा घरफाळा जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:13 IST2020-05-16T16:12:03+5:302020-05-16T16:13:43+5:30
महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी तब्बल ४० लाख रुपयांचा घरफाळा एका दिवसांत जमा झाला. कोरोना असल्यामुळे नागरिकांनी ऑनलाईनद्वारे १४ लाख ३२ हजार रुपये तर सुविधा केंद्रात २५ लाख ७१ हजारांची रक्कम जमा झाली. महापालिकेचे शहरात १ लाख ४६ हजार मिळकतधारक आहेत.

CoronaVirus Lockdown : पहिल्याच दिवशी ४० लाखांचा घरफाळा जमा
कोल्हापूर : महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी तब्बल ४० लाख रुपयांचा घरफाळा एका दिवसांत जमा झाला. कोरोना असल्यामुळे नागरिकांनी ऑनलाईनद्वारे १४ लाख ३२ हजार रुपये तर सुविधा केंद्रात २५ लाख ७१ हजारांची रक्कम जमा झाली. महापालिकेचे शहरात १ लाख ४६ हजार मिळकतधारक आहेत.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वच कामावर परिणाम झाला आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे घरफाळा विभागाने यंदाची बिले गुरुवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.
३० जूनपर्यंत घरफाळा भरल्यास सहा टक्के सवलतही दिली. सवलतीचा फायदा घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात रांगा लागल्या. घरफाळा विभागाकडून यंदाची बिले तयार करण्यास विलंब झाला. बिले तयार करण्याचे गुरुवारी सर्व काम पूर्ण झाले.
कोरोना असल्यामुळे बिल घरपोच करण्यास अडचण निर्माण झाली. पोस्टाने बिल देण्यास यावर्षी विलंब होण्याची शक्यता आहे. सवलत योजनेपासून नागरिक वंचित राहू नयेत म्हणून बिले महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.
कोरोनामुळे पोस्टातून घरफाळा बिल देण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळकतधारकांनी संकेतस्थळावर कराची रक्कम पाहून सहा टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा. कोरोनाच्या संकटात घरफाळा जमा करून महापालिकेला सहकार्य करावे.
- संजय भोसले,
करनिर्धारक, महापालिका