Coronavirus kolhapur updates -गडहिंग्लजमध्ये १९ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 17:02 IST2021-04-19T17:00:47+5:302021-04-19T17:02:16+5:30
Coronavirus Gadhinglaj Kolhapur : गडहिंग्लज शहरात बाहेरून येणार्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.यावेळी १९ दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतल्या. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी येथील दसरा चौकात वाहनांची तपासणी करुन ही कारवाई केली.

Coronavirus kolhapur updates -गडहिंग्लजमध्ये १९ वाहनांवर कारवाई
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरात बाहेरून येणार्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.यावेळी १९ दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतल्या. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी येथील दसरा चौकात वाहनांची तपासणी करुन ही कारवाई केली.
शहरातील दसरा चौकात आजरा,चंदगड, गारगोटी, निपाणी व संकेश्वरहून येणार्या वाहनांच्या तपासणीसाठी अडथळे उभारण्यात आले
आहेत.विनामास्क फिरणार्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे.
या मोहिमेत विमा, लायसन्स आदी कागदपत्रे नसलेल्या वाहनांवरही कडक कारवाई करण्यात आली.संचारबंदीचा भंग करून विनाकारण वाहनावरून शहरात फिरणाऱ्यांची वाहने ताब्यात घेण्यात आली. लॉकडाऊन संपल्यावरच ही वाहने संबंधितांना परत देण्यात येणार आहेत.