लोकसहभागातून कोरोनामुक्ती शक्य - संदीप कोळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:40+5:302021-06-09T04:30:40+5:30
बालिंगे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक शाळेत कोविड विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी संदीप कोळेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

लोकसहभागातून कोरोनामुक्ती शक्य - संदीप कोळेकर
बालिंगे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक शाळेत कोविड विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी संदीप कोळेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच मयूर जांभळे होते. यावेळी कोळेकर म्हणाले शहराशी बालिंगा गावचा संपर्क आहे. शहरालगतची गावे हॉटस्पॉट होत असताना तुलनेत बालिंगे गावातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. याबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक करत गाव कोरोनामुक्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे आवाहन करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले.
सरपंच मयूर जांभळे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे. गावातील रुग्णांवर येथेच उपचार व्हावेत, यासाठी कोविड केंद्र सुरू केले असून त्यासाठी गावातील डॉक्टरांची खूप मोठी मदत झाली. कोरोना महामारीचा सामना करताना ग्रामस्थांनी सहकार्य केल्याचे सांगितले
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे, माजी सरपंच अनिल पोवार, माजी उपसरपंच श्रीकांत भवड, उपसरपंच पंकज कांबळे, मंडल अधिकारी विलास तोडकर, तलाठी किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जांभळे, विजय जांभळे, कृष्णात माळी, रंगराव वाडकर, संदीप सुतार, अजय भवड, धनंजय ढेंगे उपस्थित होते. स्वागत ताज मुल्लाणी यांनी तर ग्रामसेवक आर. आर. भगत यांनी प्रास्ताविक केले.