corona virus : कोरोनाची दाहकता कमी, ११८४ चाचण्या, २१ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 10:59 IST2020-12-10T10:56:29+5:302020-12-10T10:59:39+5:30
CoronaVirusUnlock, Hospital, Kolhapur कोरोनावरील लस केव्हा यायची ती येवो; पण कोल्हापूर जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग संपल्यात जमा आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ११८४ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या; परंतु त्यातून केवळ २१ व्यक्तींचे निदान झाले. त्यावरूनच या साथीची जिल्ह्यातील तीव्रता एकदमच कमी झाल्याचे दिसून येते.

corona virus : कोरोनाची दाहकता कमी, ११८४ चाचण्या, २१ नवीन रुग्ण
कोल्हापूर : कोरोनावरील लस केव्हा यायची ती येवो; पण कोल्हापूर जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग संपल्यात जमा आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ११८४ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या; परंतु त्यातून केवळ २१ व्यक्तींचे निदान झाले. त्यावरूनच या साथीची जिल्ह्यातील तीव्रता एकदमच कमी झाल्याचे दिसून येते.
गेल्या २४ तासांत ९१४ आरटीपीसीआर, १३२ ॲन्टिजेन तर १३८ खासगी लॅबमधून संशयित व्यक्तींच्या स्रावांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातून फक्त २१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर शहरात नऊ, गडहिंग्लज तालुक्यात दोन, तर भुदरगड, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. त्याच वेळी जिल्ह्यातील ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यातील आरोग्याची स्थिती अतिशय सामान्य झाली आहे. नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्यांची संख्याही एकदम घटली असून ती २२२ पर्यंत खाली आली आहे.