corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृतांची संख्या ६०० च्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 13:29 IST2020-08-27T13:28:55+5:302020-08-27T13:29:40+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ६०० च्या वर गेली आहे. त्यामुळे अजूनही प्रशासनाला मृत्युदरावर नियंत्रण आणण्यात यश आलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Corona virus: Over 600 corona deaths in Kolhapur district | corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृतांची संख्या ६०० च्या वर

corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृतांची संख्या ६०० च्या वर

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृतांची संख्या ६०० च्या वरजिल्ह्यात ७८३९ रुग्णांवर उपचार सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ६०० च्या वर गेली आहे. त्यामुळे अजूनही प्रशासनाला मृत्युदरावर नियंत्रण आणण्यात यश आलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच या २४ तासांमध्ये नवे ७९७ नवे रुग्ण सापडले असून यामध्ये कोल्हापूर शहरातील तब्बल २७७ रुग्णांचा समावेश आहे. या २४ तासांत १६ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ६०५ झाली आहे.

दिवसभरामध्ये ६९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, एकूण डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ९०४ इतकी झाली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ७८३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, येथील सीपीआर रुग्णालयामध्ये २० हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्यात आल्याने तिथे ऑक्सिजन बेड वाढवण्यामध्ये आरोग्य विभागाला यश आले आहे.

Web Title: Corona virus: Over 600 corona deaths in Kolhapur district