CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात चार कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 18:33 IST2020-05-07T18:08:58+5:302020-05-07T18:33:27+5:30
येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातून आज गुरूवारी चार कोरोनामुक्त रूग्णांना संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला.

CoronaVirus Lockdown : कोल्हापुरात चार कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज
समीर देशपांडे
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातून आज गुरूवारी चार कोरोनामुक्त रूग्णांना संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला.
६ एप्रिल रोजी कसबा बावडा येथील वृध्देचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तिघे जण पॉझिटिव्ह ठरले होते. याआधीच कसबा बावडा येथील वृध्दा कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र त्यांच्यावर न्युमोनियाचे उपचार सुरू होते.
या चारही जणांचे सर्व अहवाल बुधवारी निगेटिव्ह आल्याने त्यांना गुरूवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील महिला आणि मुंबईहून कर्नाटकमध्ये कंटेनरमधून निघालेल्या दोन कोरोनाग्रस्त महिला आणि पुरूषाचा समावेश आहे. आता सीपीआरच्या कोरोना विशेष उपचार कक्षात केवळ चार जणांवर उपचार सुरू आहेत.