CoronaVirus Lockdown : आजअखेर २५५२१ मजूर कोल्हापुरातून रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 01:13 PM2020-05-21T13:13:25+5:302020-05-21T13:14:42+5:30

आजअखेर एकूण १९ रेल्वेमधून २५ हजार ५२१ मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत.

Corona Virus Lockdown: 25521 laborers leave Kolhapur today | CoronaVirus Lockdown : आजअखेर २५५२१ मजूर कोल्हापुरातून रवाना

CoronaVirus Lockdown : आजअखेर २५५२१ मजूर कोल्हापुरातून रवाना

Next
ठळक मुद्देआजअखेर २५५२१ मजूर कोल्हापुरातून रवानासर्वाधिक १३ हजार ५५२ उत्तर प्रदेशमधील

कोल्हापूर - आजअखेर एकूण १९ रेल्वेमधून २५ हजार ५२१ मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत.

आज दुपारी १ वा जिल्ह्यातील १२२४ मजुरांना घेवून बिहारमधील आरारियाकडे रेल्वे रवाना झाले. लोकमतचे संपादक वसंत भोसले, आयएसटीई नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवला. सायंकाळी ५ वाजता जिल्ह्यातील १५०९ मजुरांना घेवून बिहारमधील बरोनीकडे रेल्वे रवाना झाली.

खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्यध्यक्ष भरत रसाळे आणि एस.एच.पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी डॉ. महादेव नरके, डी.डी.पाटील, प्रा. राजेंद्र रायकर, हेमंत उलपे, पार्थ मुंडे, दिपक थोरात, शामराव कदम आदी उपस्थित होते.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण २५ हजार ५२१ रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक १३ हजार ५५२ उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत. बिहारकडे ८ हजार ४२१, मध्यप्रदेशकडे १०६६, झारखंडकडे १४६० आणि राजस्थानकडे १४७७ मजूर परतले आहेत.

Web Title: Corona Virus Lockdown: 25521 laborers leave Kolhapur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.