Corona virus kolhpaur: 167 new patients in the district, both died | corona virus kolhpaur updates : जिल्ह्यात नवे १६७ रुग्ण, दोघांचा मृत्यू

corona virus kolhpaur updates : जिल्ह्यात नवे १६७ रुग्ण, दोघांचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात नवे १६७ रुग्ण, दोघांचा मृत्यूरुग्णसंख्या दोनच्या आत आल्याने लोकांना जरा दिलासा

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६७ नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या १,५४० रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या दोनच्या आत आल्याने लोकांना जरा दिलासा मिळाला.

या १६७ नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ६७ जणांचा समावेश आहे. तर नगरपालिका क्षेत्रातील १४ आणि अन्य जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यात तीन, चंदगड पाच, गडहिंग्लज १, हातकणंगले ११, कागल दोन, करवीर २२, पन्हाळा नऊ, राधानगरी चार, शाहूवाडी चार, शिरोळ ९ अशी अन्य तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची दिवसभरातील आकडेवारी आहे. दिवसभरामध्ये ९६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २५२९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. २५४ जणांची ॲंटिजेन चाचणी करण्यात आली आहे.
 

  • सर्वात जास्त रुग्ण कोल्हापूर ६७
  • सर्वात कमी रुग्ण आजरा, गगनबावडा प्रत्येकी ००
  • गडहिंग्लज : १
  • कागल : २

Web Title: Corona virus kolhpaur: 167 new patients in the district, both died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.