corona virus : जिल्हा परिषदेत पुन्हा वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:41 IST2020-09-15T12:40:01+5:302020-09-15T12:41:03+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेत अभ्यागतांना आत न सोडण्याची मुदत संपल्याने दिवसभर नागरिकांची वर्दळ दिसून आली. बहुतांश पदाधिकारीही दिवसभर उपस्थित होते.

corona virus : जिल्हा परिषदेत पुन्हा वर्दळ
ठळक मुद्देजिल्हा परिषदेत पुन्हा वर्दळअभ्यागतांना आत न सोडण्याची मुदत संपल्याने वर्दळ
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत अभ्यागतांना आत न सोडण्याची मुदत संपल्याने दिवसभर नागरिकांची वर्दळ दिसून आली. बहुतांश पदाधिकारीही दिवसभर उपस्थित होते.
कोरोना रुग्णांची संख्या जिल्हा परिषदेत वाढू लागल्याने गेल्या आठवड्यात इतर नागरिकांसाठी बंदी घालण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी कडक भूमिका घेत हजारो जणांना परत पाठवून दिले.
त्यामुळे गेले पाच दिवस जिल्हा परिषदेत केवळ पदाधिकारी, कर्मचारी दिसत होते. मात्र आता ही मुदत रविवारी (दि. १३) संपल्यामुळे सोमवारी दिवसभर गर्दी दिसून आली.