शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

corona virus : पालकमंत्री सतेज पाटील यांचे सलाम कोल्हापूरकर अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 12:10 IST

corona virus : कोरोनाकाळामध्ये लोकांच्या मदतीसाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सर्वसामान्य नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून पालकमंत्री सतेज पाटील यांनी सलाम कोल्हापूरकर हे अभियान राबविले आहे. यानिमित्ताने संकट काळामध्ये मदतीसाठी सदैव तत्पर असणारे सर्वसामान्य कोल्हापूरकर प्रथमच होर्डिंगवर झळकले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्री सतेज पाटील यांचे सलाम कोल्हापूरकर अभियानकोरोना संकटातील समाजभान : होर्डिंग्जवर झळकले कोरोना योद्धे

कोल्हापूर : कोरोनाकाळामध्ये लोकांच्या मदतीसाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सर्वसामान्य नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून पालकमंत्री सतेज पाटील यांनी सलाम कोल्हापूरकर हे अभियान राबविले आहे. यानिमित्ताने संकट काळामध्ये मदतीसाठी सदैव तत्पर असणारे सर्वसामान्य कोल्हापूरकर प्रथमच होर्डिंगवर झळकले आहेत.

या अभियानाची जोरदार चर्चा कोल्हापुरात आहे. गेल्या वर्षी पहिल्या लाटेवेळी पालकमंत्री पाटील यांनी सर्व कोरोना फ्रंटलाइन वर्कर्सचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावर आम्हाला तुमचा अभिमान आहे हे अभियान राबविले होते.या अभियानाबद्दल पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूर गेले जवळपास १५ महिने कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटाशी लढत आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस, फ्रंटलाइन वर्कर, प्रशासन तर या संकटाचा मुकाबला करीत आहेतच, पण यांच्या सोबतीने कोल्हापुरातील काही सामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय कार्यकर्ते, युवा पिढीसुद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता या संकटाला सामोरे जाण्यासाठी समाजाला मदत करीत आहेत.

पडद्यामागे राहणारे हे जनसामान्य हे खरे या संकटकाळातील हीरो आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई सुरू राहीलच; पण या सगळ्या कोल्हापूरकरांना सलाम करायलाच हवा. त्यासाठीच सलाम कोल्हापूरकर हा विनम्र प्रयत्न आहे. कोरोनाच्या या लढ्यात आपला वाटा उचलणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात कोल्हापूरकरांना मनापासून सलाम आहे. आपल्या आजूबाजूला असे पडद्यामागे राबणारे हात असतील तर त्यांचे कौतुक जरूर करा. आपले हे कृतज्ञतेचे शब्द या सर्वांना बळ देतील. आपण सगळे मिळून ही लढाई जिंकूया.यांना केला सलाम...या अभियानामध्ये, व्हाइट आर्मी, सीपीआर रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना स्वतःच्या पॉकेटमनीमधून नाश्ता देणारी अर्पिता राऊत, आचल कट्यारे, श्रेया चौगुले, श्रुती चौगले या चार युवती, शववाहिका चालक प्रिया पाटील, युवासेवक झाउंडेशन, कोल्हापूर जिल्हा बैतूलमाल कमिटी, हंगर हेल्पर ग्रुप, मनस्पंदन फौउंडेशन, कोल्हापूर वुई केअर - एनजीओ कम्पॅशन 24, भास्कर भोसले, मिलिंद यादव, अमोल बुड्ढे, कल्पना भाटिया, रिक्षाचालक जितेंद्र शिंदे, हर्षल सुर्वे, साक्षी पन्हाळकर, दीपा शिपूरकर, सारिका बकरे, ऐश्वर्य मुनीश्वर, संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे, अवधूत भाट्ये, रोटरी मूव्हमेंट ऑफ कोल्हापूर, क्रेडाई कोल्हापूर आणि फोर्टी वनर्स क्लब ऑफ कोल्हापूर, उत्तरेश्वर थाळी या स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर