corona virus : वनअधिकारी विजय खेडकर यांचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 20:01 IST2020-08-22T19:55:17+5:302020-08-22T20:01:44+5:30
अगदी आठवड्यापूर्वी पुण्याला बदली झाली म्हणून गेलेले वन्यजीव विभागाच्या राधानगरी तत्कालिन विभागीय वनअधिकारी विजय खेडकर (वय ३८) यांचा कोरोनामुळे शुक्रवारी पुण्यात खासगी रूग्णालयात मृत्यू झाला.

corona virus : वनअधिकारी विजय खेडकर यांचा कोरोनामुळे मृत्यू
कोल्हापूर : अगदी आठवड्यापूर्वी पुण्याला बदली झाली म्हणून गेलेले वन्यजीव विभागाच्या राधानगरी तत्कालिन विभागीय वनअधिकारी विजय खेडकर (वय ३८) यांचा कोरोनामुळे शुक्रवारी पुण्यात खासगी रूग्णालयात मृत्यू झाला.
खेडकर हे गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापुरात वन्यजीव विभागाचे राधानगरीचे विभागीय वनअधिकारी म्हणून कार्यरत होते. १३ आगस्टला काही वनअधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये खेडकर यांची पुण्याला विभागीय वनअधिकारी (कॅम्पा) या पदावर बदली झाली. खेडकर कोल्हापुरात स्वातंत्रदिनी ध्वजवंदनासाठी उपस्थित होते.
त्यानंतर ते १७ आगस्टला बदलीच्या ठिकाणी हजर झाले. त्याच दिवशी त्यांना त्रास सुरू झाल्याने रूग्णालयात दाखल करावे लागले. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील असल्याने त्यांचे आई वडील पुण्यातच आहेत. मात्र पत्नी मुले कोल्हापुरात होती.
चार दिवस त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांच्या पत्नीसह मुलांना पुण्याला नेण्यात आले. एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा असा चारच दिवसांत झालेला मृत्यू वनविभागातील सर्वांनाच चटका लावून गेला आहे.