शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

corona virus : इचलकरंजी, चंदगडमध्ये धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:15 PM

कोल्हापूर जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. त्यातच पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने भर पडत आहे. रविवारी दिवसभरात २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये इचलकरंजीतील नऊ, चंदगड तालुक्यातील सहाजणांचा समावेश आहे; तर चौघाजणांना डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, इचलकरंजी आणि चंदगड तालुक्यांतील वाढता समूह संसर्ग रोखण्याचे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान बनले आहे.

ठळक मुद्देइचलकरंजी, चंदगडमध्ये धोका वाढलासमूह संसर्गाचा धोका वाढला : नवे २४ रुग्ण दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. त्यातच पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने भर पडत आहे. रविवारी दिवसभरात २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये इचलकरंजीतील नऊ, चंदगड तालुक्यातील सहाजणांचा समावेश आहे; तर चौघाजणांना डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, इचलकरंजी आणि चंदगड तालुक्यांतील वाढता समूह संसर्ग रोखण्याचे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान बनले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे. रविवारी सायंकाळी सुमारे ४०० चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यांमध्ये ३६४ अहवाल निगेटिव्ह आले, तर २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; शिवाय गडहिंग्लज तालुक्यातील सहा व्यक्तींचे चाचणी अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रात्री उशिरा दुसऱ्या टप्प्यात इचलकरंजीत कलानगरमध्ये ४५ वर्षीय पुरुष, तर महात्मा गांधी हौसिंग सोसायटीमध्ये ३३ वर्षीय महिला असे दोन अहवाल पॉझिटिव्ह आले.रविवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या २४ पॉझिटिव्ह चाचणी अहवालांमध्ये इचलकरंजीमध्ये नऊ, चंदगड तालुक्यातील सहा रुग्ण आढळले. त्यामध्ये मोऱ्याचीवाडी- दोन, केरिवडे, शेणोली, शिनोळी, कन्नुर बुद्रुक येथे प्रत्येकी एक रुग्ण, शिरोळ तालुक्यात नांदणी येथे दोन, राधानगरी तालुक्यात ठिकपुर्ली व फेजीवडे येथे प्रत्येकी एक, याशिवाय वडगाव शहर, जयसिंगपूर शहर, भुयेवाडी (ता. करवीर), तुप्परवाडी (ता. गडहिंग्लज), कोरोची (ता. हातकणंगले) येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. दिवसभरात चार रुग्णांचा डिस्चार्ज दिला.आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ९६५ रुग्णसंख्या झाली असून ७४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत फक्त २०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.वडगाव नगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रवेशकोरोना महामारीचा कोल्हापूर जिल्ह्यात कहर सुरू आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत सर्व तालुक्यांत व सर्व नगरपालिका हद्दींत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. फक्त वडगाव व पन्हाळा नगरपालिका हद्दीत कोरोनाचा शिरकाव रोखण्यात प्रशासनाला यश आले होते; पण रविवारी कोरोना विषाणूने वडगाव नगरपालिका हद्दीतही प्रवेश केला. लाटवडे रोडवरील पेठवडगावमध्ये एका ३७ वर्षीय पुरुषाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वडगाव नगरपालिका प्रशासन हादरले आहे.जूनमध्ये डिस्चार्ज, जुलैमध्ये रुग्णवाढकोल्हापूर जिल्ह्यात मार्चअखेर, एप्रिल, मे महिन्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. तसे संपूर्ण जून महिन्यात नवे रुग्ण कमी दाखल झाले; पण उपचाराअंती डिस्चार्ज घेऊन घरी जाणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने प्रशासन समाधानी होते; पण जुलै महिन्यात पुन्हा मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासन पुन्हा चिंताग्रस्त बनले आहे.तालुकानिहाय एकूण रुग्णसंख्या :आजरा - ८७, भुदरगड- ७६, चंदगड- १११, गडहिंग्लज- ११०, गगनबावडा- ७, हातकणंगले- १८, कागल- ५८, करवीर- ३०, पन्हाळा- २९, राधानगरी- ७३, शाहूवाडी- १८७, शिरोळ- १२, कोल्हापूर महापालिका हद्द- ५९, नगरपालिका- ८८ (इचलकरंजी- ६६, जयसिंगपूर- ५, कुरुंदवाड- ९, गडहिंग्लज- ३, कागल- १, शिरोळ- २, हुपरी- १, पेठवडगाव १), जिल्हे व राज्य (सातारा २, पुणे २, सोलापूर ३, मुंबई ४, नाशिक १, कर्नाटक ७, आंध्रप्रदेश १)- २०. एकूण रुग्णसंख्या- ९६५. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर