corona virus : पन्हाळा शहरात पाचजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:53 IST2020-08-03T17:51:27+5:302020-08-03T17:53:04+5:30
पन्हाळा शहरात रविवारी पाचजणांचे कोरोना अहवाल ' पॉझिटिव्ह आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली.

corona virus : पन्हाळा शहरात पाचजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
पन्हाळा : पन्हाळा शहरात रविवारी पाचजणांचे कोरोना अहवाल ' पॉझिटिव्ह आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली.
एकूण तीसजणांचे स्वब घेण्यात आले होते, पैकी वीस जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पन्हाळ्यात आजअखेर कोरोना बंधितांची संख्या दहा झाली आहे.
दरम्यान पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर येथील दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पन्हाळा हे शहर कमी लोकसंख्येचे असल्यामुळे परस्पर लोकांचा एकमेकांशी संपर्क येत आहे म्हणून जास्तीत जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे पन्हाळा शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्षा रूपाली धडेल व मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले .