corona virus : जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 10:23 AM2020-11-07T10:23:43+5:302020-11-07T10:24:26+5:30

Coronavirus, hospital, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाच्या केवळ ३५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून रुग्णवाढीचा टक्का ५.२६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे.

corona virus: 95% cure rate in the district | corona virus : जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर

corona virus : जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवररुग्णवाढीचा टक्का ५.२६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाच्या केवळ ३५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून रुग्णवाढीचा टक्का ५.२६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून कोरोना संसर्ग रोखण्यात आरोग्य तसेच जिल्हा प्रशासनास यश आले असून नवीन रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जिल्ह्यात ४५२ रुग्ण घरांतून तर २८८ रुग्ण विविध रुग्णालयांतून उपचार घेत आहेत. सध्या जिल्ह्यात केवळ ७४० कोरोनाचे रुग्ण आहेत.

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील आजरा, चंदगड, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात एकही रुग्णाची नोंद झाली नाही, तर गगनबावडा, कागल, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात प्रत्येक एक नवीन रुग्णाची नोंद झाली. भुदरगड व करवीर तालुक्यात प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले तर कोल्हापूर शहरात १२ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णवाढीचा वेग ५.२६ पर्यंत खाली आला आहे.

कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील ७२ वर्षीय महिला, शिराळा तालुक्यातील पणुंद्रे येथील ७५ वर्षीय पुरुष तर देवगड तालुक्यातील साळशी येथील ५९ वर्षीय पुरुष अशा तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्युदर ३.४१ टक्के इतका आहे. आतापर्यंत जिल्ह्यात रुग्णसंख्या ४८ हजार १४ इतकी झाली असून त्यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४६ हजार १४ वर पोहोचली आहे.

Web Title: corona virus: 95% cure rate in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.