corona virus : कोल्हापुरात ९२९ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 06:57 PM2020-10-08T18:57:02+5:302020-10-08T18:58:51+5:30

CoronaVirus, kolhapurnews, cprhospital, healthdepartment कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी ९२९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. एकीकडे रुग्ण बरे होत असताना दुसरीकडे १९५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

corona virus: 929 patients corona free in Kolhapur | corona virus : कोल्हापुरात ९२९ रुग्ण कोरोनामुक्त

corona virus : कोल्हापुरात ९२९ रुग्ण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात ९२९ रुग्ण कोरोनामुक्तआरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी ९२९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. एकीकडे रुग्ण बरे होत असताना दुसरीकडे १९५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्याची परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याचे गुरुवारी या आकडेवारीवरुन पहायला मिळाले. नवीन नोंद झालेल्या १९५ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही ४६ हजार ३७७ वर पोहचली असून ११ जणांच्या मृत्यूमुळे एकूण मृतांचा आकडा १५२५ वर गेला. ९२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३८ हजार ५५२ इतकी झाली आहे. तर ७८२५ एवढेच रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील बारापैकी आठ तालुक्यातून कोरोना हद्दपार होत आहे. सुरवातीच्या काळात कोल्हापूर व इचलकरंजी ही दोन शहरे संसर्गाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरली होती. दाट नागरी वस्ती असलेल्या या शहरातील साथ रोखण्याचे एक मोठे आव्हान होते, मात्र तेथेही आता साथ आटोक्यात आली आहे.

कोल्हापूर शहरात रोज ३० ते ४० नवीन रुग्ण तर इचलकरंजी शहरात तीन चार रुग्ण आढळून येत आहेत. मृत्यूचा आकडाही आता कमी झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात आता रुग्णालयात सहज बेड उपलब्ध होत आहेत.

Web Title: corona virus: 929 patients corona free in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.