corona virus-कोल्हापूर जिल्ह्यात 26 अहवाल पॉझीटिव्ह,तिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 09:06 PM2020-07-16T21:06:35+5:302020-07-16T21:11:11+5:30

जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 617 प्राप्त अहवालापैकी 518 निगेटिव्ह तर 26 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (तिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह आहे.) 2 नमुने नाकारण्यात आले आहेत तर 68 अहवाल प्रलंबित आहेत.

corona virus- 26 reports positive in Kolhapur district, second report of three positive | corona virus-कोल्हापूर जिल्ह्यात 26 अहवाल पॉझीटिव्ह,तिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह

corona virus-कोल्हापूर जिल्ह्यात 26 अहवाल पॉझीटिव्ह,तिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात 26 अहवाल पॉझीटिव्हतिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह

कोल्हापूर : जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 617 प्राप्त अहवालापैकी 518 निगेटिव्ह तर 26 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (तिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह आहे.) 2 नमुने नाकारण्यात आले आहेत तर 68 अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 1541 पॉझीटिव्हपैकी 917 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 585 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

 आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 26 पॉझीटिव्ह अहवालापैकी कागल-1, करवीर-8, नगरपालिका क्षेत्र- 3, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 व इतर जिल्हा व राज्य -1 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

आजरा- 97, भुदरगड- 81, चंदगड- 181, गडहिंग्लज- 135, गगनबावडा- 7, हातकणंगले- 42, कागल- 63, करवीर- 126, पन्हाळा- 54, राधानगरी- 75, शाहूवाडी- 195, शिरोळ- 34, नगरपरिषद क्षेत्र- 230, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-189 असे एकूण 1509 आणि जिल्हा व राज्यातील 32 असे मिळून एकूण 1541 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 1541 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 917 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 39 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 585 इतकी आहे.
 

 

Web Title: corona virus- 26 reports positive in Kolhapur district, second report of three positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.