ठळक मुद्देगेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे २४ नवे रुग्ण११६ जणांची अँटिजेन टेस्ट
कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे नवे २४ रुग्ण आढळले आहेत. गेले काही दिवस हा आकडा २० च्या आत होता. मात्र, आता नवे २४ रुग्ण आढळले असून, कुणाचाही मृत्यू झालेला नाही. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये १४ रुग्णसंख्या नोंदविली गेली आहे.भुदरगड, गडहिंग्लज, हातकणंगले, करवीर, राधानगरी, शिरोळ या तालुक्यांत हे रुग्ण नोंदविले गेले आहेत. सध्या केवळ ८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात २४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
३५१ जणांची तपासणी करण्यात आली असून, १०११ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ११६ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे.