Corona number of patients less than 400, 20 new patients, one woman died | कोरोना रुग्णांची संख्या चारशेच्या आत, नवे २० रुग्ण, एका महिलेचा मृत्यू

कोरोना रुग्णांची संख्या चारशेच्या आत, नवे २० रुग्ण, एका महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची संख्या चारशेच्या आतनवे २० रुग्ण, एका महिलेचा मृत्यू

कोल्हापूर -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४००च्या आत आली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे २० रुग्ण आढळले असून, एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

आजरा, भुदरगड, चंदगड, हातकणंगले, कागल, शिरोळ, नगरपालिका क्षेत्रांत एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात मात्र नऊ नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरामध्ये ५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६८४ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ७९२ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १०२ जणांची अन्टीजेन टेस्ट करण्यात आली असून, ३९८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

यापुढचा आठवडा महत्त्वाचा

दिवाळीनंतरच्या आकडेवारीमध्ये मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग कमालीचा घसरत असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. कोल्हापुरातही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे डिसेंबरचा पहिला आठवडा त्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जर कोल्हापूरकरांची प्रतिकारशक्ती वाढली असेल तर आता येतात त्याप्रमाणेच कोरोना रुग्णांची संख्या कमीच राहणार आहे.

Web Title: Corona number of patients less than 400, 20 new patients, one woman died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.