शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-जिल्हा हद्दीवर नाकाबंदी अधिक कडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:21 IST

‘कोरोना’ची वाढती व्याप्ती पाहता जिल्ह्यातील सीमा हद्दीवर नाकाबंदी आणखी कडक करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसह जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकासह वाहनात बसलेल्या सर्वांच्या माहितीचे संकलन करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. त्याशिवाय वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’चा परिणाम : जिल्हा हद्दीवर नाकाबंदी अधिक कडकपोलिसांकडून वाहनांतील प्रवाशांची माहिती संकलन; कसून तपासणी

कोल्हापूर : ‘कोरोना’ची वाढती व्याप्ती पाहता जिल्ह्यातील सीमा हद्दीवर नाकाबंदी आणखी कडक करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसह जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकासह वाहनात बसलेल्या सर्वांच्या माहितीचे संकलन करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. त्याशिवाय वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे.‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रमुख २२ मार्गांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता; तो आणखी कडक केला आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय जिल्ह्यात कोणी प्रवेश करणार नाही, याची दक्षता पोलीस दलाकडून घेतली जात आहे.

इतर जिल्ह्यांतून अगर परप्रांतांतून वाहनांतून अगर पायी येणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर आहे. अशा व्यक्तींना उचलून थेट पोलिसांच्या ‘होम सेंटर'मध्ये दाखल केले जाते. तेथे वैद्यकीय तपासणी होते.

दरम्यान, दि. २८ मार्चला काही रुग्णवाहिकेतून बोगस रुग्ण दाखवून जिल्ह्यात प्रवेश करताना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पकडले होते. त्याच दिवशी एका रुग्णवाहिकेतून वृद्धा कोल्हापुरात आली. त्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यामुळे आता पोलिसांनी नाकाबंदी अधिक तीव्र केली आहे.

जिल्ह्यात प्रवेशणाऱ्या अत्यावश्यक वाहनांसह प्रत्येक वाहनचालकाची व वाहनात असणाऱ्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कोठून आला, कोठे जाणार, आदी सर्व माहितीसह त्यांचे फोटो काढून संकलित केले जात आहेत.मुंबईकरांचा सोलापूरमार्गे कोल्हापूर प्रवासमुंबई परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढले. तेथे अडकलेले काहीजण थेट कोल्हापुरात न येता मुंबईतून मिळेल त्या वाहनाने सोलापूरसारख्या जिल्ह्यात जातात व तेथून कोल्हापूर शहरात येण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यानुसार अत्यावश्यक वाहनांची कसून तपासणी केली जात असल्याचे चित्र आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसbikeबाईकkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग