corona in kolhapur-भाजपतर्फे गवत मंडई येथे गरजूंना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:08 IST2020-04-13T15:07:19+5:302020-04-13T15:08:49+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीत गरीब व गरजूंना धान्य देण्याचा उपक्रम भारतीय जनता पार्टीने राबविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून टिंबर मार्केट परिसरातील गवत मंडई येथे गरजू कुटुंबांना एक महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले.

कोल्हापुरातील गवत मंडई, टिंबर मार्केट परिसरातील गरजू कुटुंबांना भाजपतर्फे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी चित्रलेखा आगरवाल, विजय आगरवाल, आदी उपस्थित होते.
ठळक मुद्देभाजपतर्फे गरजूंना धान्य वाटपकोल्हापुरातील गवत मंडई, टिंबर मार्केट परिसरात वाटप
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीत गरीब व गरजूंना धान्य देण्याचा उपक्रम भारतीय जनता पार्टीने राबविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून टिंबर मार्केट परिसरातील गवत मंडई येथे गरजू कुटुंबांना एक महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले.
भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या सहकार्यातून व महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. गवत मंडई येथील गरजू कुटुंबांना भागातील ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या चित्रलेखा आगरवाल व भाजप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय आगरवाल यांच्या हस्ते महिनाभर पुरेल इतके धान्य व शिधावाटप करण्यात आले.