गोकुळच्या शिरोळच्या ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 06:29 PM2021-04-21T18:29:27+5:302021-04-21T18:32:22+5:30

CoronaVirus GokulMilk Kolhapur : कोरोना मुळे शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथील ठरावधारक राजाराम शिवाप्पा हेंगाणा ( वय वर्षे 71 ) यांचा मृत्यू झाला. विकास सहकारी दूध संस्थेचे ते चेअरमन होते. शाहूवाडीतील सुभाष पाटील यांच्या पहिल्या मृत्यू नंतर जिल्ह्यातील दुसरा बळी शिरोळ तालुक्यातील गेल्याने ठरावधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Corona kills Gokul's Shirol resolution holder | गोकुळच्या शिरोळच्या ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू

गोकुळच्या शिरोळच्या ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देगोकुळच्या शिरोळच्या ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यूठरावधारकांमध्ये भीतीचे वातावरण

बुबनाळ : कोरोना मुळे शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथील ठरावधारक राजाराम शिवाप्पा हेंगाणा ( वय वर्षे 71 ) यांचा मृत्यू झाला. विकास सहकारी दूध संस्थेचे ते चेअरमन होते. शाहूवाडीतील सुभाष पाटील यांच्या पहिल्या मृत्यू नंतर जिल्ह्यातील दुसरा बळी शिरोळ तालुक्यातील गेल्याने ठरावधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बुबनाळ येथील राजाराम शिवाप्पा हेंगाणा यांना प्रकृती बिघडल्यामुळे पंधरा दिवसापूर्वी मिरज मिशन हॉसिपटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जयसिंगपूर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

गेल्या चार पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने व्हेटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. आज पहाटे त्याच्या वर उदगाव अंकली नाक्यावरील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Corona kills Gokul's Shirol resolution holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.