कोरोना ‘गो’...डेंग्यू, चिकुनगुण्या ‘इन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:11+5:302020-12-05T04:59:11+5:30
: कागल शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चिकुनगुण्या आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...

कोरोना ‘गो’...डेंग्यू, चिकुनगुण्या ‘इन’
: कागल शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चिकुनगुण्या आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येथील ग्रामीण रुग्णालयांबरोबरच कागल आणि कोल्हापूर शहरात खासगी रुग्णालयांत सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असून शहरात एकही रुग्ण नाही. हे चांगले चित्र एका बाजूला असताना चिकुनगुण्या आणि डेंग्यूसारख्या आजराचा प्रादुर्भाव वाढत जाणे धोकादायक आहे. नगरपालिकेकडून औषध फवारणी आणि स्वच्छता केली जात असली तरी या आजारावरची उपाययोजना नाही. दावणे वसाहतीमध्ये तर एक एक घरात चार चार रुग्ण आहेत. हे आजार कागल शहरात दोन महिने झाले ठाण मांडून बसले आहेत, असे चित्र आहे. सामान्य माणसाबरोबरच उच्चभ्रू व्यक्तींनाही डेंग्यृू झाला आहे. नगरपालिकेने यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी मागणी होत आहे.