Corona : देवस्थान समितीतर्फे गरजूंना धान्य किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 17:32 IST2020-07-19T17:26:42+5:302020-07-19T17:32:06+5:30
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे गरजूंना धान्य किटचे वाटप करण्यात आले

Corona : देवस्थान समितीतर्फे गरजूंना धान्य किटचे वाटप
ठळक मुद्देदेवस्थान समितीकडून धान्य वाटपकोल्हापूर येथे गरजूंना मदत
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे गरजूंना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांचे व्यवसाय ठप्प झाले, यामुळे अनेकावर उपासमारीची वेळ आली. याची जाणीव ठेवून देवस्थान समितीच्या वतीने छोटीसी मदत म्हणून धान्याचे किट देत आहोत, असे मनोगत यावेळी अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष मोहन चव्हाण,दिपक खराडे, विवेक सुर्यवंशी, तसेच देवस्थान समितीचे उपसचिव शितल इंगवले, उत्तम मिटके आणि नाभिक समाजातील लाभार्थी उपस्थित होते