कॉपी केली तर थेट गुन्हाच; आयुष्य खराब होईल भावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:46 IST2025-02-15T15:45:38+5:302025-02-15T15:46:06+5:30
११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कॉपीमुक्त अभियानही राबवण्यात आले.

कॉपी केली तर थेट गुन्हाच; आयुष्य खराब होईल भावा!
कोल्हापूर : दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास कॉपी करणारा, कॉपीस सहकार्य करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे. ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कॉपीमुक्त अभियानही राबवण्यात आले.
शिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा सूची दिली आहे. विद्यार्थ्यांना अडचण असेल तर समुपदेशक नेमण्यात आले आहेत. त्यांची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल. जर विद्यार्थी तणावात असतील? परीक्षा कशी द्यायची याचा ताण त्यांच्यावर असेल तर ते समुपदेशकाची मदत घेऊ शकतात. तसेच, विद्यार्थ्यांना परीक्षा सूची दिली आहे. त्याचे पालन करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
दहावी, बारावीची परीक्षा कधी?
दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ती १७ मार्चपर्यंत चालेल. तर बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
हॉलतिकीट विसरले तरी पेपर देता येणार
अनेकवेळा परीक्षा केंद्रावर विद्यार्थी हॉल तिकीट घेऊन जाण्यास विसरतात. अशा वेळी त्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही. हॉल तिकीट नसेल तरी त्या विद्यार्थ्याला परीक्षा देता येणार आहे. मात्र, त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल. दुसऱ्या दिवशी मात्र त्याला हॉल तिकीट आणणे बंधनकारक राहील.
दृष्टिक्षेपात परीक्षा जिल्ह्यात दहावीचे परीक्षार्थी : ५४,६४४
जिल्ह्यातील परीक्षा केंद्र : १३८
जिल्ह्यातील एकूण शाळा : ९७७
जिल्ह्यातील बारावीचे परीक्षार्थी: ५०,८२६
जिल्ह्यातील एकूण परीक्षा केंद्रः ७३
एकूण कनिष्ठ महाविद्यालये : ३७९