शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

सल्लागार कंपनीवरून प्रचंड गदारोळ महापालिका महासभा

By admin | Updated: July 29, 2014 00:01 IST

व्यासपीठावर धावत जाणे व घोषणाबाजीने सभागृह दणाणले

कोल्हापूर : थेट पाईपलाईनसाठी नेमलेल्या ‘युनिटी कन्सल्टन्सी’ या सल्लागार कंपनीने इचलकरंजी शहरात काम केल्याचा खोटा दाखला जोडला आहे. बोगस कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी कंपनीवर दंडात्मक कारवाई करून पाईपलाईन कामाची जबाबदारी निश्चित करा, या प्रमुख मागणीसाठी आज, सोमवारी महापालिकेच्या सभेत नगरसेवक व प्रशासन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या. जोरात ओरडत व्यासपीठावर धावत जाणे व घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले. कंपनीच्या कागदपत्रांची छाननी करून कारवाईची माहिती पुढील सभेत देण्याचे आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला. अध्यक्षस्थानी महापौर सुनीता राऊत होत्या. ‘सल्लागार कंपनीला हाकला’ अशी घोषणाबाजी करतच निषेधाचे फलक घेऊन शिवसेना-भाजप व जनसुराज्य पक्षाच्या १८ नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. सल्लागार कंपनीच्या चुकीमुळेच शहरातील सातशे कोटींचे प्रकल्प रखडले आहेत. ‘आयआरबी’सारखी पुन्हा फसगत नको. योजना सक्षम व पारदर्शकपणे राबविण्याची मागणी जयंत पाटील, मुरलीधर जाधव, महेश कदम, भूपाल शेटे, आदी नगरसेवकांनी केली. प्रचंड आरडाओरड करीत उपायुक्त संजय हेरवाडे, जलअभियंता मनीष पवार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना अक्षरश: धारेवर धरले.दोन वर्षांपूर्वी केलेल्या या प्रकल्प अहवालास सभागृहाने मंजुरी दिली आहे. कमी खर्चात दर्जेदार काम करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. केंद्र शासनाच्या संबंधित विभागाच्या निर्देषाप्रमाणे पाईपलाईनचे सर्व साहित्य आयएसआय नामांकितच असेल. पाईपलाईनची चाचणी त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाईल. यापुढे सदस्यांसह कोणीही उपस्थित केलेल्या शंकेला किंवा पत्राला तत्काळ लेखी उत्तर देण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले. प्रचंड गोंधळात तब्बल चार तास चाललेली सभा संपली. (प्रतिनिधी) गांधी मैदानाच्या निधीवरून कलगीतुरा कोल्हापूर : विकासासाठी रविकिरण इंगवले यांनी स्वत: निधी आणल्याचा बाऊ करीत गांधी मैदानावर थाटात उद्घाटन केले. गृहराज्यमंत्र्यांसह सत्यजित कदम यांच्यावर टीका केली. याचे पडसाद आज, सोमवारी महासभेत उमटले. नेमका निधी कुणी आणला यावरून नगरसेवक सत्यजित कदम, रविकिरण इंगवले व शारंगधर देशमुख यांनी प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले. गांधी मैदानासह इतर विकासकामांसाठी २० कोटींचा निधी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आणला आहे. याचे फुकटचे श्रेय कोणासही घेऊ देणार नाही. फुकटच्या प्रसिद्धीसाठी पोस्टरबाजी करून कोणी निवडणुकीची तयारी करीत असल्यास त्यास आमचा विरोध नाही. मात्र, नेत्यावर होणारे आरोप सहन केले जाणार नाहीत, असे सत्यजित कदम व शारंगधर देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सभागृहातून बाहेर गेलेले रविकिरण इंगवले परत आले. निधीसाठी कोणाच्या शिफारशीचे पत्र आहे का निधी असाच हवेतून पडला याचा जाब प्रशासनाला विचारला. निधीसाठी कोणाचेही लेखी पत्र नसल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्पष्ट केले. यावरूनच सर्व काही स्पष्ट होत आहे. मी कोणाच्या ताटाखालील मांजर नाही. थेट पाईपलाईनप्रश्नी मी जनसुराज्य पक्षासोबत असल्याचे जाहीर करीत इंगवले यांनी सभागृहात प्रत्युत्तर दिले.