कोल्हापूर : पीडित महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या चंदगड पोलिस ठाण्यातील हवालदार सुनील बळीराम कुंभार (वय ४७, रा. तळसंदे) याला रविवारी रात्री निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी ही माहिती दिली. कुंभार याच्याविरोधात गांधीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला होता.पीडित महिला वर्षापूर्वी एका प्रकरणात गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आली होती. या गुन्ह्याचा तपास हवालदार कुंभार याच्याकडे होता. ओळखीचा फायदा घेत त्याने पीडितेशी सलगी वाढवली. त्यातून अनैतिक संबंध निर्माण झाले.आयुष्यभर सांभाळतो असे आमिष दाखवून त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले होते. लग्नास नकार देत मारहाण केल्याची संशयिताविरोधात पीडितेने गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. कुंभार याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल होताच रविवारी रात्री त्याचे निलंबन करण्यात आले.
Web Summary : Chandgad police constable Sunil Kumbhar suspended after being accused of raping a woman under the false pretense of lifelong care. He exploited her vulnerability after meeting during a case investigation in Gandhinagar police station. The victim filed a complaint leading to Kumbhar's suspension.
Web Summary : चंदगढ़ पुलिस कांस्टेबल सुनील कुंभार को आजीवन देखभाल का झूठा वादा करके एक महिला से बलात्कार करने के आरोप में निलंबित कर दिया गया। गांधीनगर थाने में एक मामले की जांच के दौरान मुलाकात के बाद उसने उसकी भेद्यता का फायदा उठाया। पीड़िता की शिकायत के बाद कुंभार को निलंबित कर दिया गया।