शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

मूककर्णबधिरांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 11:06 AM

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मूककर्णबधिरांनी एकत्र येत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धरणे धरले. गेली सात वर्षे सातत्याने अन्याय होत असल्याचे निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देमूककर्णबधिरांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 कोल्हापूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मूककर्णबधिरांनी एकत्र येत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धरणे धरले. गेली सात वर्षे सातत्याने अन्याय होत असल्याचे निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांना देण्यात आले.राज्यात ३ लाख मूकबधीर आहेत. यापैकी ३० हजार जण साक्षर आहेत. त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र, त्यांना राज्यात समान वागणूक मिळत नाही. दिव्यांगांच्या नावावर खोटी वैद्यकीय अपंग प्रमाणपत्रे बनवून दिव्यांगाच्या सवलती लाटल्या जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.दिव्यांग महामंडळासाठी विविध पदे भरलेली नाहीत, स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय असावे, शाळेतील शिक्षकांना सांकेतिक खुणांची भाषा येत नाही. यासाठी विशेष योजना जाहीर केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. विविध योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळत नाही, मूककर्णबधिरांसाठी दुभाषिक शिक्षकांसह महाविद्यालय सुरू करावे, महाराष्ट्रात मूककर्णबधिरांच्या उच्चशिक्षणाची सोय नसल्याने नोकरी भरतीच्या जाहिरातीत उच्चशिक्षणाची अट घालू नये, १९९५ पासून आमच्या आरक्षणातून नोकरी मिळविलेल्यांची वैद्यकीय तपासणी करावी, यासारख्या विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.यावेळी मूककर्णबधीर असोसिएशनचे अध्यक्ष उद्धव पन्हाळकर, उपाध्यक्ष अतुल फणसाळकर, सचिव अमेय गवळी, उपसचिव अतुल भाळवणे, खजिनदार गौरव शेलार, सदस्य तेजस मुरगुडे, संतोष मिठारी, अमोल कवाळे, धीरज कांबळे, प्रियांका महामुनी, जयश्री गवळी उपस्थित होत्या. 

टॅग्स :Divyangदिव्यांगcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर