शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे

By admin | Updated: July 2, 2015 00:25 IST

कल्लाप्पाण्णा आवाडे : इचलकरंजी शहर काँग्रेस समितीचा मेळावा

इचलकरंजी : सहकार चळवळीच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेत्यांनी विकासाची गंगा आणली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवीत कार्यकर्त्यांनी वाटचाल केली पाहिजे. मात्र, सध्या बदललेल्या शासनकर्त्यांकडून स्वार्थाचे राजकारण करीत वेगळ्या पद्धतीने लोकशाही रूजवली जात आहे. म्हणूनच गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील लढाई करावी, असे आवाहन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्या मेळाव्यामध्ये माजी खासदार आवाडे बोलत होते. ते म्हणाले, आबासाहेब खेबुडकर, दत्ताजीराव कदम, बाबासाहेब खंजिरे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना काही पथ्ये आम्ही पाळली आहेत. यापुढे सुद्धा ग्रामीण परिसराचा विकास साधण्यासाठी हेच ध्येय कायम ठेवले पाहिजे. माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, सत्ता आणि राजकारण बदलल्यानंतर भूलथापा देऊन जनतेची फसवणूक करण्याचे कारनामे भाजप करीत आहे. विकासकामांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे. आता कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी सजगपणे चुकीच्या कामाला विरोध करावा.सुरुवातीला प्रकाश मोरे यांनी स्वागत व अहमद मुजावर यांनी प्रास्ताविक केले. शामराव कुलकर्णी, शशांक बावचकर, आदींनी आपले विचार मांडले. मेळाव्यासाठी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, प्रकाश सातपुते, रणजित कदम, विलास गाताडे, रणजित जाधव, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अंजली बावणे, राहुल खंजिरे, चंद्रकांत इंगवले, अमृत भोसले, आदी उपस्थित होते. यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना आर्य भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)बिरंजे यांच्यावर अविश्वास ठरावमेळाव्यामध्ये बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी नगरपालिकेचे आयजीएम हॉस्पिटल, काळम्मावाडी नळ योजना आणि रस्ता कामासाठी मंजूर झालेले बारा कोटी रुपये आदींबाबत प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच संधिसाधूपणाने राजकारणात पोळी भाजून घेणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. एक वर्षाची मुदत संपताच नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करावा, असेही निर्देश दिले.