शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेसने वाजवला ‘भोंगा’, विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:32 IST

कोल्हापूर : पेट्रोल , डिझेल, गॅस या इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी भोंगा वाजवून आंदोलन करत ...

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी भोंगा वाजवून आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी शहरातील विविध ठिकाणी रॅली काढून पथनाट्य सादर करून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली.येथील काँग्रेस कमिटीपासून सकाळी साडेदहा वाजता रॅली सुरू झाली. दाभोळकर कॉर्नर, पार्वती टॉकीज येथील पेट्रोल पंपांसमोर निर्दशने आणि पथनाट्य सादर करण्यात आले. तेथून संभाजीनगर येथील पेट्रोलपंपासमोर पथनाट्य सादर करून रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत रिक्षावर भोंगा लावण्यात आला होता. त्यावर निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. महिला कार्यकर्त्यांनी पथनाट्य सादर केले.या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सचिव संजय पोवार-वाईकर, महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पोवार, एनएसयूआयचे अध्यक्ष अक्षय शेळके, संजय मोहिते, दुर्वास कदम, विक्रम जरग, प्रदीप चव्हाण, वैशाली महाडिक, शुभांगी साखरे, अमर समर्थ, आदी सहभागी झाले होते.हेच का? अच्छे दिनया आंदोलनात ‘पेट्रोल, डिझेल शंभरपार, मोदी बस्स करा, जनतेची लूटमार’ अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. सिलिंडरचे दर लिहिलेले फलक हातात घेऊन त्यांनी ‘हेच का? अच्छे दिन’ अशी विचारणा केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरInflationमहागाईcongressकाँग्रेसBJPभाजपाPetrolपेट्रोल