शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

काँग्रेस-राष्टÑवादीचा ६-४ चा फॉर्म्युला ! : ‘शिरोळ’ राष्टवादीकडेच राहणार; मैत्रीसाठी ‘शाहूवाडी’त विनय कोरे यांना ‘बाय’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:44 AM

विधानसभेसाठी कॉँग्रेस व राष्टवादी कॉँग्रेसची आघाडी निश्चित झाली असून, २८८ पैकी जवळपास २३० जागांचे वाटपही पूर्ण झाले आहे. कोल्हापुरातील दहापैकी पाच जागांवर राष्टवादीने दावा केला असला, तरी वरिष्ठ पातळीवर चार

ठळक मुद्दे विधानसभेसाठी जागा निश्चिती

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : विधानसभेसाठी कॉँग्रेस व राष्टवादी कॉँग्रेसची आघाडी निश्चित झाली असून, २८८ पैकी जवळपास २३० जागांचे वाटपही पूर्ण झाले आहे. कोल्हापुरातील दहापैकी पाच जागांवर राष्टÑवादीने दावा केला असला, तरी वरिष्ठ पातळीवर चार जागांवरच समझोता झाला असून, दोन्ही कॉँग्रेसचा ६-४चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे कामही सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ आली आहे; पण लोकसभेच्या मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा केलाच, त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत विधानसभेची तयारी सुरू केली. विभागनिहाय पक्षप्रमुखांच्या बैठका घेऊन रणनीती ठरवली जात आहे. कॉँग्रेसच्या पातळीवरही अशीच तयारी सुरू असून, पहिल्या टप्प्यात दोन्ही कॉँग्रेसच्या महाआघाडीत ‘शेकाप’, ‘जनता दल’, ‘स्वाभिमानी’, ‘मनसे’ हे पक्ष सहभागी होतील, असे वाटते. त्यानुसारच जागावाटपाचा फॉर्म्युला दोन्ही कॉँग्रेसमध्ये निश्चित झाला आहे.

कॉँग्रेसच्या गुरुवारी (दि. १३) झालेल्या मुंबईतील बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी २००९ च्या विधानसभेच्या फॉर्म्युल्यानुसार जागावाटप करावे, असा आग्रह धरला आहे. ‘कागल’, ‘राधानगरी-भुदरगड’ व ‘चंदगड’ वगळता उर्वरित सात जागांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे. २००९ ला राज्यात राष्टÑवादी १३४, तर कॉँग्रेस १५४ जागांवर लढली होती. मतदारसंघाची झालेली पुनर्रचना आणि जागांच्या अदलाबदलीत राष्टÑवादीला कोल्हापुरातील तीनच जागा मिळाल्या होत्या. २०१४ ला दोन्ही कॉँग्रेस पक्ष स्वतंत्र लढले. राष्टÑवादीने नऊ जागा लढवीत दोन जागी यश मिळविले, तर कॉँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. लोकसभा निवडणुकीतील अनुभव पाहता, जागांसाठी फारशी ताणाताणी न करता ‘इलेक्टिव्ह मेरिट’वरच जागांचे वाटप होणार आहे. कोल्हापूर शहरातील एका मातब्बर युवा नेत्याला ‘उत्तर’मधून रिंंगणात उतरविण्याचे राष्टÑवादीचे प्रयत्न आहेत. हा उमेदवार हाताला लागला नाही, तर राष्टÑवादी चार जागांवरच लढणार हे निश्चित असून, त्यानुसार तयारी केली आहे.कॉँग्रेसची ‘करवीर’, ‘दक्षिण’, ‘उत्तर’, ‘हातकणंगले’, ‘इचलकरंजी’ या मतदारसंघांत ताकद आहे.

‘शाहूवाडी’मध्ये कर्णसिंह गायकवाड आहेत; पण स्थानिक राजकारणात ते माजी मंत्री विनय कोरे यांच्यासोबत आहेत. कोरे हे भाजपचे सहयोगी असले, तरी जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची दोन्ही कॉँगे्रसशी जवळीक आहे. २०१४च्या निवडणुकीत राष्टÑवादीने जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना ‘शाहूवाडी’तून उतरविले. त्यांनी आक्रमक प्रचारयंत्रणा राबवीत चांगली मते मिळविली. त्याचा फटका बसल्याचे शल्य आजही कोरे यांचे कार्यकर्ते बोलून दाखवितात; त्यामुळे आगामी ‘गोकुळ’, ‘जिल्हा बॅँक’, बाजार समितीच्या निवडणुकांत कोरे यांची मदत आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांना होते. यासाठी दोन्ही कॉँग्रेसनी ‘शाहूवाडी’त कोरे यांना ‘बाय’ दिला तर नवल वाटायला नको....तर शिरोळमध्ये मैत्रीपूर्ण लढतमहाआघाडीतील ‘स्वाभिमानी’ पक्षाचा ‘शिरोळ’च्या जागेवर दावा राहणार आहे; पण येथून राष्टÑवादीतर्फे राजेंद्र पाटील-यड्रावकर हे इच्छुक आहेत.दोन्ही पक्षांत समझोता झाला नाही, तरएक तर येथे मैत्रीपूर्ण लढतहोईल अथवा विधानपरिषदेचाशब्द देऊन एकाला शांत केले जाऊ शकते.भास्करराव जाधव,सुरेश पाटील निरीक्षकराष्टवादीने ‘राधानगरी-भुदरगड’ व ‘चंदगड’ मतदारसंघांसाठी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांची, तर ‘शिरोळ’साठी सुरेश पाटील (सांगली) यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.कोरेंची ‘वेट अँड वॉच’ची भूमिकामहायुतीत जनसुराज्य पक्ष आहे; पण ‘शाहूवाडी’ व ‘हातकणंगले’ची जागा शिवसेनेकडे असून, येथून विद्यमान आमदार सत्यजित पाटील-सरुडकर व सुजित मिणचेकर हे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. यामुळे विनय कोरे यांची कोंडी झाली आहे. जागावाटपाच्या ताणाताणीत युती तुटली तर मित्र पक्ष सोबत असले पाहिजेत. ‘शाहूवाडी’, ‘करवीर’ व ‘हातकणंगले’ या जागा ‘जनसुराज्य’ला देण्याची रणनीती भाजपची आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर