शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

करवीरमध्ये ग्रामंपचायत निवडणूकीत कॉँग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 6:12 PM

करवीर तालुक्यात अंत्यत अटीतटीने झालेल्या ग्रामंपचायत निवडणूकीत कॉग्रेसने आपला वरर्चष्मा कायम राखला. प्रतिष्ठेच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत पन्नास पैकी तब्बल बावीस जागा जिंकत अजून तालुक्यात कॉँग्रेस घट्ट असल्याचा इशारा शिवसेना-भाजपला दिला.

ठळक मुद्देकरवीर तालुक्यात तब्बल २२ ठिकाणी सरपंच तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट

कसबा बावडा/ कोपार्डे , दि. १७ :  करवीर तालुक्यात अंत्यत अटीतटीने झालेल्या ग्रामंपचायत निवडणूकीत कॉग्रेसने आपला वरर्चष्मा कायम राखला. प्रतिष्ठेच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत पन्नास पैकी तब्बल बावीस जागा जिंकत अजून तालुक्यात कॉँग्रेस घट्ट असल्याचा इशारा शिवसेना-भाजपला दिला.

सोळा ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली तर पाच शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले. पण ज्या ताकदीने भाजपने ग्रामपंचायतीच्या निवडणूका लढविल्या होत्या, ते पाहता त्यांच्या पदरात फारसे यश मिळाले नाही. राष्ट्रवादी  पुन्हा अस्तित्वहीन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

करवीर तालुक्यातील ११७ पै की ५० ग्रामपंचायतीसाठी गेले महिनाभर रणधुमाळी सुरू होती. वडणगे, वाकरे, सांगरूळ, उचगाव, पाचगाव, गोकुळ शिरगाव या मोठ्या गावात काट्याची टक्कर पहावयास मिळाली. साम, दाम, दंड या नितीचा सर्रास वापर झाल्याने बड्या नेत्यांना निवडणूकीने घाम फोडला.

सोमवारी अत्यंत चुरशीने ७८ टक्के मतदान झाले. मंगळवारी सकाळी दहा पासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात झाली. प्रथम पोस्टल मते मोजण्यात आली. त्यानंतर सहा फेºयामध्ये ५० गावांची मोजणी करण्यात आली.

दक्षिण विधानसभा मतदारसंघात १९ पैकी १३ ग्रामपंचायतींवर कॉँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी बाजी मारली. भाजपला केवळ कावणे, दिंडनेर्ली, निगवे खालसा, वसगडे या चार ठिकाणी सत्ता मिळवता आली. उर्वरित ठिकाणी अपक्ष व स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली.

करवीर मध्ये ३१ पैकी ९ ग्रामपंचायतींवर कॉँग्रेसने वर्चस्व राखले तर पाच ठिकाणी शिवसेनेने कब्जा केला. स्थानिक आघाड्यांचे सरपंच पंधरा ठिकाणी विजयी झाले. परिते येथे राष्ट्रवादीचे आक्काताई सुदाम कारंडे या विजयी झाल्या. निवडणूक नियंत्रक अधिकारी करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे, नायब तहसीलदार एस. ई. सानप यांनी काम पाहिले.

पहिला गुलाल शिवसेनेचापहिल्या फेरीत प्रयाग चिखलीसह इतर गावांची मोजणी करण्यात आली. यामध्ये पहिला निकाल प्रयाग चिखलीच्या सरपंच पदाचा लागला. यामध्ये शिवसेनेच्या उमा संभाजी पाटील विजयी झाल्या.

सिग्नल मिळताच एकच जल्लोषमतमोजणी केंद्रातून निकाल घेऊन बाहेर पडताच समर्थकांना हात वर करून विजयाचा सिंग्नल देत होते. सिंग्नल मिळताच केंद्राबाहेर थांबलेले कार्यकर्ते एकच जल्लोष करत होते. काही उत्साही कार्यकर्त्यांनी अंगातील कपडे काढून आनंदोत्सव साजरा केला.

सख्या बहिणी विजयी

सांगरुळ मध्ये प्रभाग क्रमांक ५ मधून सविता मगदूम तर प्रभाग क्रमांक ३ मधून अर्चना खाडे या सख्या बहिणी शिवसेना-भाजप आघाडीतून विजयी झाल्या. मांडरेत सरपंच पदाच्या निवडणूकीत अर्चना पाटील यांनी आपली नणंद गुणाताई पाटील यांचा पराभव केला.

सत्यजीत पाटील यांची बाजीकसबा बीड येथे ‘गोकुळ’ चे संचालक सत्यजीत पाटील यांनी सरपंच पद खेचले तर दुसरे संचालक बाळासाहेब खाडे यांना मात्र सांगरूळ मधील पंधरा वर्षाची सत्ता गमवावी लागली.

गड आला पण सिंह गेलासावरवाडी, शिंगणापूर, परितेसह तालुक्यात अनेक ठिकाणी बहुमत मिळाले पण सरपंच पद गमवावे लागले. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती पहावयास मिळाली.

दोन ठिकाणी चिठ्ठीचा आधारशेळकेवाडी, परिते व हसूर दुमाला येथे सदस्य पदासाठी दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने तिथे चिठ्ठीव्दारे विजयी घोषीत करण्यात आले. यामध्ये अनुक्रमे लता महादेव शेळके, अश्विनी सागर पाटील व गीता सर्जेराव सावर्डे या विजयी झाल्या.

विजयी सरपंच असे-

उमा पाटील (चिखली), रंगराव शेळके ( शेळकेवाडी), वंदना चौगले (पासार्डे), अमर कांबळे (भाटणवाडी), सुनिल टिपुगडे (कावणे), मिनाक्षी जाधव (सादळे-मादळे), सुप्रिया वाडकर (हणबरवाडी), सुवर्णा परीट (कांचनवाडी), आक्काताई कारंडे ( परिते), सुवर्णा कारंडे (सावर्डे दुमाला), छाया कांबळे (सडोली दुमाला), ईश्वरा कांबळे (आरळे), मोहन पाटील (सोनाळी), रूपाली मेडसिंगे (कांडगांव), अर्चना पाटील (कंदलगाव), पार्वती चौगले (म्हाळुंगे), अस्मिता कांबळे (नंदवाळ), दिपाली नाईक (नागाव), मंगल जाधव (सावरवाडी), अर्चना पाटील (मांडरे), कविता साहेकर (चुये), सत्यजीत पाटील (कसबा बीड), सिंकदर मुजावर (आंबेवाडी), वसंत तोडकर (वाकरे), दत्तात्रय कांबळे (हिरवडे दुमाला), अनिल मुळीक (दºयाचे वडगाव), उज्वला शिंदे (कणेरी), प्रकाश पाटील (नेर्ली), सदाशिव बाटे (बोलोली), लता कांबळे (जैत्याळ), उत्तम माने (सरनोबतवाडी), पुजा पाटील (हिरवडे खालसा), सुनंदा कुंभार (मोरेवाडी), मंगल कुंभार (दिंडनेर्ली), रमेश कांबळे (भुये), अजित पाटील (हसूर दुमाला), सविता माने (उजळाईवाडी), पांडूरंग महाडेश्वर (निगवे खालसा), शोभा खोत (कणेरीवाडी), सारिका जाधव (दोनवडे), रितू लालवाणी (गांधीनगर), अनिता पाटील (पाडळी बुद्रूक), प्रकाश रोटे (शिंगणापूर), सदाशिव खाडे (सांगरूळ), संग्राम पाटील (पाचगाव), मालूबाई काळे (उचगाव), नेमगोंडा पाटील (वसगडे), युवराज कांबळे (चिंचवडे), सचिन चौगले (वडणगे), महादेव पाटील (गोकुळ शिरगांव).

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक