शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

-सांगली जिल्हा परिषदेच्या चौदा गटात काट्याची टक्कर

By admin | Updated: February 19, 2017 00:19 IST

नेत्यांचाही फोकस : व्होट बँक खेचण्यासाठी जोरदार हालचाली

अशोक डोंबाळे--सांगली  राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्हा परिषदेच्या चौदा गटातील लढती लक्षवेधी असून, तेथील विजय खेचून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, रयत विकास आघाडीच्या नेत्यांनी फोकस ठेवला आहे. यासाठी भावकी, पै-पाहुणे, जाती-पातीचे राजकीय गणित मांडण्याबरोबरच, छोट्या समाजाची व्होट बँक खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे स्वयंभू नेत्यांचा भाव वधारला आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले असल्यामुळे त्यावर डोळा ठेवून दिग्गज मैदानात उतरले आहेत. काहींनी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही जिल्हा परिषद गटातील लढती प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. मांगले (ता. शिराळा), भिलवडी, कुंडल (ता. पलूस), कडेपूर (ता. कडेगाव), नागेवाडी (ता. खानापूर), खरसुंडी (ता. आटपाडी), उमदी (ता. जत), कवलापूर, विसापूर, सावळज, (ता. तासगाव), एरंडोली (ता. मिरज), वाळवा तालुक्यातील बोरगाव, चिकुर्डे, बागणी आदी चौदा जिल्हा परिषद गटामधील लढती अत्यंत चुरशीच्या होत आहेत. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि रयत विकास आघाडीच्या नेत्यांनी येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा घेऊन व्होट बँक खेचण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कवलापूर येथे, तर राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या तासगाव तालुक्यात सभा झाल्या आहेत. काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी जत तालुक्यात नीलेश राणे यांची सभा घेतली होती. उमदीत कडवी झुंज उमदी (ता. जत) येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अ‍ॅड्. चन्नाप्पा होर्तीकर विरूध्द काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्यात कडवी झुंज आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी होर्तीकरांसाठी प्रचार केला आहे. सावंत यांच्या प्रचाराची सुरूवात काँग्रेसचे युवा नेते नीलेश राणे यांच्या उपस्थितीत झाली आहे. भाजपचे संजय तेली यांनीही दोन्ही काँग्रेस उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे.पाण्याचा प्रश्न : कवलापुरात पेटला...कवलापूर गट काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे काँग्रेसचे निवास पाटील, राष्ट्रवादीचे भानुदास पाटील, भाजपचे शिवाजी डोंगरे आणि शिवसेनेचे सतीश निळकंठ अशी चौरंगी लढत होत आहे. या मतदार संघात पाच गावे असून ती कृष्णा नदीपासून हाकेच्या अंतरावर आहेत. तरीही तेथे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याच प्रश्नावरून मतदार आता उमेदवारांना जाब विचारत आहेत. पाण्यासाठीचा उद्रेक पाहून उमेदवारांची पंचाईत झाली आहे. काहींनी कूपनलिका खुदाई करून मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. चारही उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, भावकी, पै-पाहुणे आणि बाहेरचा उमेदवार, असे मुद्दे प्रचारात रंगू लागले आहेत.कुंडलमध्ये आप्पा, भाऊंमध्ये चुरसकुंडल (ता. पलूस) गटात आ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र (आप्पा) लाड (काँग्रेस) व क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांचे पुत्र, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद (भाऊ) लाड (राष्ट्रवादी) अशा दिग्गज नेत्यांमध्ये चुरशीची लढत होत आहे. कदम कुटुंबीयांनी महेंद्रआप्पांचा विजय खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे, तर शरदभाऊंना गुलाल लावायचाच, या निर्धाराने त्यांचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. प्रत्येक मताचे गणित मांडून कार्यकर्ते प्रचाराची रणनीती आखत आहेत. बागणी (ता. वाळवा) गटात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत (रयत विकास आघाडी) व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे (राष्ट्रवादी) आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे (अपक्ष) असा तिरंगी सामना रंगला आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागावरील शिंदे घराण्याची पकड किती मजबूत आहे, हे स्पष्ट होणार आहे. याला जयंत पाटील यांचेही पाठबळ आहे. सदाभाऊंची संघटनेच्या रूपाने किती पेरणी झाली आहे, याचाही सोक्षमोक्ष लागणार आहे. सत्ता विकेंद्रीकरणाविरोधात कचरे आवाज उठवत असून, ते मतदारांपर्यंत प्रभावीपणे बाजू मांडत आहेत.खरसुंडीत तगडी तिरंगी लढतखरसुंडी (ता. आटपाडी) येथील गटात माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या मदतीने भाजपचे ब्रह्मदेव पडळकर यांच्या माध्यमातून कमळ फुलणार, की काँग्रेसचे नेते मोहनराव भोसले यांचे पुत्र जयदीप भोसले यांना मतदार साथ देणार, याचा नेत्यांना अंदाज आलेला नाही. येथे काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून शिवसेनेचे चंद्रकांत भोसले यांनीही तगडे आव्हान दिल्यामुळे, प्रथमच तिरंगी लढत झाली आहे. मांगलेत चुलत जावांची कसोटीमांगले (ता. शिराळा) जि. प. गटातून माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भावजय अश्विनी (राष्ट्रवादी) व जिल्हा परिषदेचे माजी सभापती उदयसिंग नाईक यांच्या स्नुषा अनन्या (भाजप) या दोन जावांमध्ये चुरशीची लढत आहे.