कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी रात्री अकरा वाजता जाहीर केली. या यादीत २९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
यादीत विधानसभा निवडणूक लढलेल्या राजेश भरत लाटकर, माजी उपमहापौर भूपाल शेटे, संजय मोहिते, मधुकर रामाणे, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण, मनसेचे जिल्हा प्रमुख राजू दिंडोर्ले यांच्यासह १६ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. महायुतीमध्ये जागा निश्चित करण्यावरून रस्सीखेच सुरू असताना काँग्रेसने जी नांवे निश्चित झाली आहेत ती जाहीर केली आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली.
या बैठकीस खासदार शाहू छत्रपती, विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार व आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पहिल्या यादीला मंजूरी देण्यात आली. या निवडीसाठी काँग्रेसच्या समितीचे सदस्य शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सुर्यकांत पाटील बुध्दीहाळकर, आनंद माने, भारती पोवार, सरलाताई पाटील, तौफिक मुल्लाणी, विक्रम जरग, भरत रसाळे यांनी काम पाहिले.
दिंडोर्ले पुरस्कृत
ज्येष्ठ नगरसेवक मधुकर रामाणे यांच्यावरही पक्षाने विश्वास दाखवून त्यांना पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उरविण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख राजू आनंदराव दिंडोर्ले यांना बेरजेचे राजकारण करून काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. उमा बनछोडे, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण या तीन माजी नगरसेविकांसह २४ महिलांचाही उमेदवार दिलेल्यात समावेश आहे.
जरग की इंगवले..?
शिवाजी पेठेतील काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणारे अक्षय विक्रम जरग व उद्धवसेनेचे राहूल इंगवले यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे या जागेवरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
प्रतिस्पर्धी पाहून निर्णय
महायुतीकडून प्रतिस्पर्धी उमेदवार कोण रिंगणात येतो यावरून कांही प्रभागातील कुणाला कोणत्या जागेवरून म्हणजे सर्वसाधारण की नागरिकांचा मागासवर्ग जागेवर लढवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. सर्वांना मंगळवारी ३० तारखेलाच एबी फॉर्म दिले जाणार आहेत.
सोमवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार
अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस शिल्लक राहिले असले तरी बहुतांशी उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत म्हणजे सोमवारी, मंगळवारीच अर्ज दाखल करणार असल्याने त्यादिवशीच झुंबड उडू शकते.
तीन कुटुंबात दोन उमेदवार
माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे हे प्रभाग क्रमांक ८ तर त्यांच्या पत्नी मयूरी इंद्रजीत बोंद्रे या प्रभाग क्रमांक २० मधून लढतील
माजी नगरसेवक राहुल शिवाजीराव माने प्रभाग क्रमांक ९ मधून तर त्यांच्या पत्नी ऋग्वेदा राहुल माने या प्रभाग क्रमांक ८ मधून लढतील.
माजी उपमहापौर भूपाल महिपती शेटे हे प्रभाग क्रमांक १८ मधून तर त्यांच्या कन्या पूजा भूपाल शेटे या प्रभाग क्रमांक १३ मधून लढतील.
राहुल माने विरुद्ध शारंगधर
प्रभाग क्रमांक नऊमधून राहुल माने यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिंदेसेनेकडून शारंगधर देशमुख रिंगणात असू शकतात. कोल्हापूर शहरातील सर्वात जंगी लढत या प्रभागात होऊ शकते. उध्दवसेनेला ज्या बारा जागा हव्या आहेत, त्या सोडून उमेदवार जाहीर करण्यात आले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
प्रभाग क्रमांक - आरक्षण : उमेदवाराचे नांव
२ - नागरिकांचा मागासवर्ग (महिला) : आरती दीपक शेळके
८ - नागरिकांचा मागासवर्ग महिला : अक्षता अविनाश पाटील
३ - नागरिकांचा मागासवर्ग : प्रकाश शंकरराव पाटील
८ - सर्वसाधारण महिला : ऋग्वेदा राहुल माने
३ - सर्वसाधारण महिला : किरण स्वप्निल तहसीलदार
८ - सर्वसाधारण : प्रशांत ऊर्फ भैय्या महादेव खेडकर
४ - अनुसूचित जाती महिला : स्वाती सचिन कांबळे
८ - सर्वसाधारण : इंद्रजित पंडितराव बोंद्रे
४ - नागरिकांचा मागासवर्ग : विशाल शिवाजी चव्हाण
९ - सर्वसाधारण महिला : पल्लवी सोमनाथ बोळाईकर
४ - सर्वसाधारण महिला : दीपाली राजेश घाटगे
९ - सर्वसाधारण महिला : विद्या सुनील देसाई
४ - सर्वसाधारण : राजेश भरत लाटकर
९ - सर्वसाधारण : राहुल शिवाजीराव माने
५ - सर्वसाधारण : अर्जुन आनंद माने
१० - सर्वसाधारण महिला : दीपा दिलीपराव मगदूम
६ - अनुसूचित जाती : रजनीकांत जयसिंह सरनाईक
११ - नागरिकांचा मागासवर्ग महिला : जयश्री सचिन चव्हाण
६ - सर्वसाधारण महिला : तनिष्का धनंजय सावंत
१२ - नागरिकांचा मागासवर्ग : रियाज अहमद सुभेदार
६ - सर्वसाधारण : प्रतापसिंह दत्तात्रय जाधव
१२ - सर्वसाधारण महिला : स्वालिया साहिल बागवान
७ - सर्वसाधारण महिला : उमा शिवानंद बनछोडे
१२ - सर्वसाधारण महिला: अनुराधा अभिमन्यू मुळीक
१२ - सर्वसाधारण : ईश्वर शांतीलाल परमार
१३ - अनुसूचित जाती महिला : पूजा भूपाल शेटे
१३ - सर्वसाधारण : प्रवीण हरिदास सोनवणे
१४ - नागरिकांचा मागासवर्ग महिला: दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला
१४ - सर्वसाधारण : अमर प्रणव समर्थ
१४ - सर्वसाधारण : विनायक विलासराव फाळके
१५ - सर्वसाधारण महिला अश्विनी अनिल कदम
१५ - सर्वसाधारण : संजय वसंतराव मोहिते
१६ - नागरिकांचा मागासवर्ग: उमेश देवाप्पा पोवार
१६ - सर्वसाधारण : उत्तम ऊर्फ भैय्या वसंतराव शेटके
१७ - अनुसूचित जाती महिला: अर्चना संदीप बिरांजे
१७ - सर्वसाधारण महिला: शुभांगी शशिकांत पाटील
१७ - सर्वसाधारण : प्रवीण लक्ष्मणराव केसरकर
१८ - अनुसूचित जाती महिला: अरुणा विशाल गवळी
१८ - सर्वसाधारण - भूपाल महिपती शेटे
१८ - सर्वसाधारण : सर्जेराव शामराव साळुंखे
१९ - अनूसूचित जाती : दुर्वास परशुराम कदम
१९ - सर्वसाधारण महिला : सुषमा संतोष जरग
१९ - सर्वसाधारण : मधुकर बापू रामाणे
२० - अनुसूचित जाती महिला: जयश्री धनाजी कांबळे
२० - नागरिकांचा मागासवर्ग महिला उत्कर्षा आकाश शिंदे
२० - नागरिकांचा मागासवर्ग: धीरज भिवा पाटील
२० - सर्वसाधारण महिला : मयूरी इंद्रजित बोंद्रे
२० - सर्वसाधारण : राजू आनंदराव दिंडोर्ले (पुरस्कृत)
Web Summary : Congress declared its first list of 48 candidates for Kolhapur Municipal Corporation elections, featuring 29 new faces. Key leaders and former corporators are included. Decision on remaining candidates pending competitor analysis.
Web Summary : कांग्रेस ने कोल्हापुर महानगरपालिका चुनाव के लिए 48 उम्मीदवारों की पहली सूची जारी की, जिसमें 29 नए चेहरे हैं। प्रमुख नेता और पूर्व पार्षद शामिल हैं। शेष उम्मीदवारों पर निर्णय प्रतिद्वंद्वी विश्लेषण के बाद होगा।