शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:36 AM

‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल शुक्रवारी जिल्हा परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सोमवारी (दि. २४) दिल्ली येथील विज्ञान भवन येथे होणाऱ्या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदनदिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण, सरपंच, स्वच्छताग्रहींची उपस्थिती

कोल्हापूर : ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल शुक्रवारी जिल्हा परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सोमवारी (दि. २४) दिल्ली येथील विज्ञान भवन येथे होणाऱ्या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे हे उद्या, रविवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. या तिघांसमवेत पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय पाटील, सावर्डे दुमाला गावच्या सरपंच सुवर्णा कारंडे, शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळेच्या सरपंच सुनीता पाटील, गडहिंग्लजचे स्वच्छताग्रही सिद्धाप्पा करिगार, राधानगरीचे स्वच्छताग्रही रोहित भंडारी हेही या पुरस्कार स्वीकारण्याच्या समारंभाला दिल्ली येथे उपस्थित राहणार आहेत.जिल्हा परिषदेच्या या यशाबद्दल पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज एकमेकांचे अभिनंदन केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सर्वांनीच घेतलेल्या कष्टांना चांगली पोहोचपावती मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

शिक्षक संघाचे नेते राजाराम वरुटे, जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, सतीश बरगे, मोहन भोसले यांनी शुक्रवारी अमन मित्तल यांची भेट घेऊन त्यांचे शिष्यवृत्ती आणि स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेतील यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच ग्रामसेवक संघटनेच्या वतीनेही मित्तल यांचे अभिनंदन करण्यात आले.

पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांचेही अनेकांनी अभिनंदन केले.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर