शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोधसाठी नेत्यांची मनधरणी

By admin | Updated: September 1, 2015 00:14 IST

शेतकरी संघाचे राजकारण : विरोधी आघाडीचीही मोर्चेबांधणी सुरू

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संघाच्या विद्यमान संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची मनधरणी सुरू केली असून, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. शेतकरी संघाच्या १९ जागांसाठी १७९ अर्ज दाखल झाले असून, बिनविरोधसाठी संघाच्या विद्यमान संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या निवडणुकीतही सत्तारूढ गटाने नेत्यांच्या सहकार्याने बऱ्यापैकी जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले होते. या वेळेलाही त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत; पण संघाची आर्थिक स्थिती काहीशी भक्कम झाल्याने माजी संचालकांनी नव्याने मोट बांधण्याची तयारी केली आहे. तशा हालचाली सुरू केल्या असून, सत्तारूढ गटानेही नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत बिनविरोधसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी संघाचे अध्यक्ष वसंतराव मोहिते, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते, माजी महापौर शिवाजीराव कदम, दिलीप पाटील मुरगूडकर, यशवंत पाटील, टाकवडेकर, युवराज पाटील, आदींनी जिल्हा बॅँकेत जाऊन आमदार मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह विविध नेत्यांशीही त्यांनी चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले.दरम्यान, विद्यमान संचालक जुनेच पॅनेल ठेवून निवडणूक बिनविरोध करा असे म्हणत असतील तर ते कसे शक्य आहे अशी विचारणा विरोधी संचालकांतून केली जात आहे. संघाचे माजी अध्यक्ष पी. डी. पाटील, माजी संचालक सुरेश देसाई, ए. वाय. साळोखे, विजय पोळ, धनाजीराव सरनोबत, जी. डी. पाटील, भादोलेचे माने यांनी एकत्रित येऊन पर्याय देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मतदारांच्या भेटीगाठीही त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यामुळे किमान निम्मे जागांवर विरोधकांना संधी मिळणार असेल तरच निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र आहे; परंतु तशी शक्यता फारच धूसर दिसत आहे. (प्रतिनिधी)विरोधकांची निम्म्या जागांची मागणी