शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
3
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
4
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
6
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
7
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
8
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
9
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
10
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
11
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
12
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
13
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
14
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
15
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
16
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
17
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
18
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
19
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
20
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?

शिक्षण संस्थांच्या निवड यादीत गुणवत्ताधारकांना डावलले!, पवित्र पोर्टलमार्फत भरतीत सावळागोंधळ

By संदीप आडनाईक | Published: July 22, 2023 1:05 PM

कमी गुण असलेल्यांची निवड, शिक्षकांचा आरोप

संदीप आडनाईककोल्हापूर : पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीतील मुलाखतीच्या निवड यादीत सावळागोंधळ असल्याचे उघडकीस आले आहे. या भरतीअंतर्गत राज्यातील १९६ शिक्षण संस्थांच्या निवड यादीत गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय झाला असून त्यांना या प्रक्रियेतून डावलल्याचा आरोप संबंधित शिक्षकांनी केला आहे.पवित्र पोर्टलमार्फत राज्यात २०१७ पासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध कारणांमुळे ही शिक्षक भरती प्रक्रिया २०२० पर्यंत रखडली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा ही भरती प्रक्रिया अपूर्ण राहिली. परंतु ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आणि त्यानंतर राज्य शासनाने १५ जुलै २०२१ रोजी शासन निर्णयाद्वारे मराठा आरक्षणाची (एसईबीसी) पदे खुल्या आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गात समाविष्ट करून यादी जाहीर करण्याचे आदेश दिले. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे याची अंमलबजावणी दीर्घकाळ झालीच नाही.संबंधित उमेदवारांनी वेळोवेळी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे ही प्रक्रिया संथ गतीने सुरू झाली. नोव्हेंबर २०२२ च्या दरम्यान १९६ शिक्षण संस्थांमधील साधारण ७६९ पदांसाठी पसंतीक्रम घेण्यात आले. परंतु डाटा मिसमॅच झाल्यामुळे हे सर्व पसंतीक्रम रद्द करून, एप्रिल २०२३ मध्ये पुन्हा नव्याने पसंतीक्रम घेण्यात आले. परंतु त्यातही जवळपास ६००० उमेदवारांना चुकीचे पसंतीक्रम आल्याने ३० मे ते ५ जून २०२३ या काळात त्या उमेदवारांचे नव्याने पसंतीक्रम घेण्यात आले. त्यानंतर १५ जुलै २०२३ रोजी १९६ शिक्षण संस्थांची मुलाखतीची निवड यादी जाहीर झाली परंतु या यादीमध्येही गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांना डावलून कमी गुण असलेल्या उमेदवारांची निवड झाल्याचे स्पष्ट झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे निवड यादी जाहीर होण्यासाठी साडेपाच वर्षे लागली. त्यातही निवड यादीत गुणवत्ताधारक उमेदवारांना डावलून कमी गुण असलेल्या उमेदवारांची निवड झाल्याने संबंधित उमेदवारांकडून संताप व्यक्त होत आहे.

शासनाने तत्काळ जाहीर झालेली निवड यादी रद्द करून, त्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि पुन्हा नव्याने निवड यादी जाहीर करावी. यासाठी पुन्हा पसंतीक्रम घेण्याची आवश्यकता नाही. -महेश पाटील, मु.पो. कुटवाड, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकPavitra Portalपवित्र पोर्टल