शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अभयारण्याचे जग समजून घेतलात तरच संघर्ष संपेल --दत्तात्रय मोरसे,, चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:10 IST

जंगल आणि वन्यप्राण्यांचे जग समजून घ्यायचे असेल तर आपल्याला ध्यानधारणेसारखी एकाग्रता आत्मसात करावी लागते - दत्तात्रय मोरसे

ठळक मुद्देपर्यावरणवादी निसर्ग साहित्यिक

इंदुमती गणेश ।गेल्या १६ वर्षांपासून अभयारण्याची सफर, भाषा आणि गव्यांवर संशोधन करणारे मठगाव (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय मोरसे यांच्या घोलमोड व झुंड या कादंबऱ्या पर्यावरणवादी निसर्ग साहित्य म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या झुंड कादंबरीला नुकताच तापीपूर्णा पुरस्कार जाहीर झाला. अभयारण्याची एकजीवनशैली आणि भाषा असते, ते समजून घेऊन त्यांच्याशी नातं घट्ट करा, असे प्रबोधन करणारे मोरसे यांची घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न : आपली पार्श्वभूमी सांगा?उत्तर : मी मठगाव येथील श्रीमंत क्षात्र जगद्गुरू विद्यालयात माध्यमिक मराठी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. जंगल फिरण्याची आवड पूर्वीपासूनच. त्यामुळे देशभरातील बºयापैकी अभयारण्यांना मी जाऊन आलो आहे. सध्या मराठी साहित्यातील वन्यजीव या विषयावर पीएच.डी. करीत आहे. अरण्याची भाषा, जंगल साक्षरता हे दोन नवीन उपक्रम मी सध्या राबवत आहे.प्रश्न : गव्यांवर संशोधन करावे असे का वाटते?उत्तर : अभयारण्यातच फिरता फिरता मी गव्यांचा अभ्यास करू लागलो. गव्यांची प्रत्येक हालचाल टिपू लागलो. अगदी दहा फुटांच्या अंतरावरून मी त्यांचे शूटिंग घेतले आहे. आता गवा थेट गावात, शिवारात येत असला, तरी पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्यांची सांकेतिक भाषा, जीवनशैली, हावभाव समजून घेऊ लागलो आणि त्यांच्यातील संवाद समजत गेला. गव्यांच्या या विश्वावरच ‘झुंड’ ही कादंबरी आहे.

प्रश्न : अभयारण्याची भाषा कशी समजते?उत्तर : जंगलात प्रत्येक ऋुतूत पानांची, झाडाचे वेगवेगळे आवाज असतात, माणसाने जंगलात पाय ठेवला की प्रत्येक प्राण्याला त्याची चाहूल लागते. ते आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना धोक्याची जाणीव करून देतात, त्याला प्रतिसाद देतात. याला अरण्याची भाषा म्हणतात. प्रत्येक प्राण्याची चालण्याची पद्धत, जंगलातील वावर, आवाजातील बदल, हे सगळं म्हणजेच अरण्याची भाषा आहे.

प्रश्न : जंगल साक्षरता उपक्रमाविषयी काय सांगाल?उत्तर : नव्या पिढीला जंगलांचे, वन्यजिवांचे महत्त्व समजावे, त्यांना जंगलाची माहिती मिळावी यासाठी मी वर्षातून ठरावीक ट्रेक आयोजित करतो. विद्यार्थ्यांना जंगलांची शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देतो. मार्गदर्शन करतो. जंगलाची-प्राण्यांची भाषा सांगतो.मानवाचेच अतिक्रमणगवा हा खरंतर पाला खाणारा प्राणी आहे. उगाचच मानवी वस्तीचा विध्वंस करायचा अशी प्राण्यांची मानसिकता नसते. माणसाने गव्यांच्या विश्वात अतिक्रमण केले आहे. वणवा, जंगलांचा नाश, शेतीसाठी वापरले जाणारे खत, उसावर किंवा पिकांवर  फवारले जाणारे कीटकनाशक यांच्या वासामुळे गव्यांची वाट चुकते आणि त्यामुळेते शेतात येतात. मग गवा आणि माणसात संघर्ष होतो. संघर्ष नेमका कुणी निर्माण केला, याचे उत्तर माणूस या शब्दावर येऊन थांबते.वन्यजीवन समजून घ्याआजकाल जंगलात फिरायला जायची फार क्रेझ आहे. मद्यपान, पॅकेटबंद चटपटीत पदार्थ जंगलात न्यायचे. वाट्टेल तो दंगा, धुडगूस घालायचा, ठिकठिकाणी कचरा करायचा असे विध्वंसक स्वरूप या सफारीचे झाले आहे. जंगल आणि वन्यप्राण्यांचे जग समजून घ्यायचे असेल, तर आपण ध्यानधारणेला ज्या समाधी अवस्थेत जातो, ती एकाग्रता स्वत:मध्ये आणावी लागेल.